गरमागरम ढोकळा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. सकाळी नाश्त्यामध्ये गरमागरम ढोकळा खायलाही अनेकांना आवडतं. शिवाय आपल्याकडे पाहूणे येणार असतील तर त्यांच्यासाठी चटकन गरमागरम ढोकळा आणि चहा हा मेन्यूही अगदी उत्तम असतो. पण अनेकजणींची ही अडचण असते की काही केलं तरी त्यांनी केलेला ढोकळा चांगला फुगतच नाही. तो थोडा चिकट होतो. त्यामुळे ढोकळा खाताना मजा येत नाही (Cooking Tips For Making Spongy Khaman Dhokla). असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर ढोकळा करताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा.(instant dhokla recipe)
ढोकळा फुगत नसेल तर काय करावं?
ढोकळा, इडली, केक असे काही जे पदार्थ असतात ते चांगल्याप्रकारे फुगून आले आणि हलके झाले तरच ते उत्तम झाले असं मानलं जातं. आता हे पदार्थ फुगून हलके होण्यासाठी त्यांच्यामध्ये योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी बेकिंग सोडा घालणं गरजेचं आहे.
अतिपावसामुळे कुंडीतल्या मातीत शेवाळं जमा झालं? 'हे' काम लगेचच करा; नाहीतर रोपं मरून जातील
इडली करताना बेकिंग सोडा नाही घातला तरी चालतो. पण ढोकळा आणि केक या पदार्थांसाठी मात्र बेकिंग सोडा अत्यावश्यक असतो. म्हणूनच ढोकळा करताना तो नेमकं कधी घालायचा ते पाहा..
ढोकळा करताना साधारणपणे आपण त्याचं पीठ एका भांड्यात तयार करून ठेवतो आणि नंतर मग कुकर किंवा दुसरं मोठं भांडं पाणी भरून गॅसवर गरम करायला ठेवतो. आता जेव्हा अशा पद्धतीने गॅसवर ठेवलेल्या भांड्यातलं पाणी गरम होईल आणि जेव्हा ढोकळ्याचं पीठ असणारं भांडं तुम्हाला बेकिंगसाठी त्या मोठ्या भांड्यात ठेवायचं असेल अगदी तेव्हाच ढोकळ्याच्या पिठामध्ये बेकिंग सोडा घाला.
न लाटता झटपट पराठे करण्याची भन्नाट ट्रिक- चवीला मस्त आणि करायला एकदम सोपे
त्यानंतर पीठ एकाच दिशेने भराभर फिरवून चांगलं हलकं करून घ्या आणि लगेचच ते भांडं बेकिंगसाठी ठेवून द्या. असं केल्याने बेकिंग सोड्याला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात उष्णता मिळते आणि तो लगेचच ॲक्टीव्ह होतो. त्याचा परिणाम म्हणजे ढोकळा चांगला फुगून हलका होतो.