Join us

सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना सांगतात नारळ फोडण्याची सोपी ट्रिक, झटपट खोबरं हातात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:32 IST

Cooking Hacks : विकास खन्ना नेहमीच त्यांच्या इंस्टाग्रामवर स्वयंपाकाच्या टिप्स आणि युक्त्या शेअर करत असतात. त्यांनी कोल्हापुरात असताना स्थानिक महिलेला ही युक्ती वापरताना पाहिले.

जेव्हा स्वयंपाकाचा विचार केला तर ते वाटतं तितकं सोपं नाही. भाज्या, डाळींसाठी किंवा  गोड पदार्थांसाठी नारळ वापरले जाते. पण नारळ फोडायचं म्हणजे खूपच किचकट काम. प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांनी कुकिंग हॅक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याचा वापर तुम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी करू शकता. यामुळे तुमचा  स्वयंपाक लवकरात लवकर व्हायला मदत होईल.  (Vikas khanna has a great hack to help you remove coconut from its shell and mind is blown)

शेफ विकास खन्ना यांनी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक आश्चर्यकारक हॅक शेअर केला आहे, जो तुम्हाला नारळ त्याच्या कवचापासून वेगळे कसे करायचे ते दाखवतो. त्यांनी आधी नारळाचे दोन भाग केले आणि त्यातील एक चुलीवर पेटवत ठेवला. कवच काळे झाल्यावर त्यांनी ते उचलले आणि थंड पाण्याच्या भांड्यात ठेवले. कवच जरा थंड झाल्यावर त्यांनी कवच आणि खोबरं फक्त १ सेकंदात वेगळे केले. ही ट्रिक जादूसारखीच दिसत होती. 

तांदळाच्या पीठापासून आकर्षक रांगोळी काढली, पक्ष्यांचा थवा येताच असं काही झालं, पाहा व्हिडिओ

विकास खन्ना नेहमीच त्यांच्या इंस्टाग्रामवर स्वयंपाकाच्या टिप्स आणि युक्त्या शेअर करत असतात. त्यांनी कोल्हापुरात असताना एका स्थानिक महिलेला ही युक्ती वापरताना पाहिले. त्यांनी त्या स्त्रीकडून ही युक्ती शिकून घेतली आणि ती त्याच्या फॉलोअर्ससह शेअर केली. व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 658K व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. लोकांना हा हॅक किती उपयुक्त वाटला याबाबत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत मांडलं आहे.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.