Join us

नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोणतं नॅचरल ड्रिंक जास्त फायदेशीर असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:07 IST

Healthy Drinks : नारळ पाणी की लिंबू पाणी यातील कोणतं ड्रिंक तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकेल हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Healthy Drinks : उन्हाळा असो वा नसो भरपूर लोक रोज नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पितात. कारण या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. जे शरीरासाठी खूप गरजेचे असतात. प्रत्येक ड्रिंकचे आपापले वेगवेगळे फायदे असतात. मात्र, दोन्ही ड्रिंकपैकी कोणतं ड्रिंक जास्त फायदेशीर असतं? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे यातील कोणतं ड्रिंक तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकेल हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

उन्ह जसजसं वाढत जातं अनेकांना डिहायड्रेशनची समस्या होऊ लागते. अशात ही समस्या होऊ नये म्हणून जास्तीत जास्त लोक रोज नारळ पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. नारळाच्या पाण्यानं केवळ आरोग्यालाच नाही तर त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. अॅसिडिटी दूर करण्यासाठी देखील तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. नारळ पाण्यातील पोषक तत्व कोरड्या त्वेचा मॉइश्चराइज करतात आणि त्वचेला ओलावा देतात. 

लिंबू पाणी पिण्याचे फायदे

लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जर तुमची इम्यूनिटी कमजोर असेल किंवा तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल तर तुम्ही रोज लिंबू पाणी प्यायला हवं. यानं इम्यूनिटी तर वाढेलच सोबतच शरीरात जमा झालेले विषारी तत्व देखील दूर निघतील. लिंबू पाण्यानं त्वचाही चांगली होते. 

काय जास्त फायदेशीर? 

दोनपैकी काय जास्त सांगायचं झालं तर लिंबू पाण्याच्या तुलनेत नारळ पाण्यात जास्त इलेक्ट्रोलाइट्स असतात. याच कारणानं एक्सपर्ट सुद्धा शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी जास्त फायदेशीर असल्याचं सांगतात. दुसरीकडे तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल किंवा तुम्हाला एनर्जी मिळवायची असेल तर लिंबू पाणी जास्त फायदेशीर ठरतं. कारण यातील अॅसिडनं शरीरातील चरबी कमी होते. दोन्हींचे आपापले फायदे आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यातील काहीही पिऊ शकता.

रोज हे हेल्दी ड्रिंक्स पिण्याचे फायदे

न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी सांगितलं की, जर तुम्ही दोन आठवडे रोज नारळ प्याल तर यानं बेली फॅट बर्न होईल आणि ब्लोटिंगची समस्या दूर होईल. जर तुम्ही रोज 2 आठवडे लिंबू पाणी प्याल यानं ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल आणि सोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासही मदत मिळेल.

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

नारळ पाणी पिण्याची अशी कोणती एक वेळ नाहीये. पण तरीही हे उपाशीपोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. सकाळी उपाशीपोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, अॅसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स