उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता एवढी वाढलेली असते की रात्रीच्या वेळी स्वयंपाक घरात जाऊन काम करण्याचा खूप कंटाळा येतो. कारण आधीच खूप घाम- घाम होत असतं. त्यात पुन्हा गॅसजवळ उभं राहून स्वयंपाक करणं म्हणजे खूपच अवघड. कारण ती उष्णता बऱ्याचदा नकोशी वाटते. त्यामुळे झटपट होणारं, सोपं आणि पचायलाही हलकं असणारं काहीतरी पाहिजे असतं. अशावेळी कोकोनट राईस किंवा नारळाचा भात हा एक मस्त पदार्थ आहे (Coconut Rice Recipe). त्यात भरपूर नारळ असल्याने उन्हाळ्यात पोटाला गारवाही मिळतो आणि शिवाय चवीमध्येही बदल होतो.(how to make coconut rice?)
कोकोनट राईस करण्याची रेसिपी
साहित्य
३ वाट्या शिजवलेला भात
१ वाटी किसलेलं नारळ
१ टेबलस्पून तूप आणि फोडणीसाठी मोहरी, हिंग, जिरे, कडिपत्ता
मिस थायलंडचा खोटा दात स्टेजवरच पडला सर्वांदेखत, तिने चटकन काय केलं पाहा.. व्हायरल व्हिडिओ
७ ते ८ काजू आणि २ ते ३ लाल मिरच्या
२ हिरव्या मिरच्या आणि १ टीस्पून आलं, लसूण पेस्ट
१ टीस्पून उडीद डाळ आणि २ टेबलस्पून शेंगदाणे
चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर
कृती
नारळाचा भात किंवा कोकोनट राईस करण्यासाठी नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्या. मात्र तो थोडा मोकळा असावा.
कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घालून फोडणी करून घ्या.
बहुसंख्य महिलांचं हिमाेग्लोबिन कमी का असतं? लोहयुक्त पदार्थ खाऊनही HB वाढत नाही कारण....
फोडणी झाल्यानंतर शेंगदाणे, काजू, लाल मिरच्या, उडीद डाळ तुपामध्ये परतून घ्या. यानंतर त्यामध्ये नारळाचा किस घालून तो ही तुपात मंद आचेवर खमंग परतून घ्या. त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि आलं, लसूण पेस्ट घालून ती ही परतून घ्या.
यानंतर मग शिजवलेला भात घाला. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घालून सगळा व्यवस्थित हलवून घ्या. कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की गरमागरम नारळ भात किंवा कोकोनट राईस तयार.
Web Summary : Beat the summer heat with a simple coconut rice recipe! This dish, featuring grated coconut, is easy to prepare and light on the stomach. The recipe includes simple steps and readily available ingredients for a quick, cooling meal.
Web Summary : गर्मी को मात देने के लिए नारियल के चावल बनाएँ! कसा हुआ नारियल से बना यह व्यंजन बनाने में आसान और पेट के लिए हल्का है। इस रेसिपी में त्वरित, ठंडे भोजन के लिए सरल चरण और आसानी से उपलब्ध सामग्री शामिल हैं।