Lokmat Sakhi >Food > श्रावण स्पेशल : चुरटी चुरम्याच्या लाडूची पारंपरिक रेसिपी, प्रसाद म्हणून खावा असा सुंदर पदार्थ...

श्रावण स्पेशल : चुरटी चुरम्याच्या लाडूची पारंपरिक रेसिपी, प्रसाद म्हणून खावा असा सुंदर पदार्थ...

Churti Churma Ladu Recipe : How To Make Churti Churma Ladu At Home : Shravan Special Food Churti Churma Ladu Recipe : श्रावण स्पेशल : पारंपरिक सौम्य पदार्थ, चव जिभेवर रेंगाळणारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 16:54 IST2025-08-20T16:42:43+5:302025-08-20T16:54:30+5:30

Churti Churma Ladu Recipe : How To Make Churti Churma Ladu At Home : Shravan Special Food Churti Churma Ladu Recipe : श्रावण स्पेशल : पारंपरिक सौम्य पदार्थ, चव जिभेवर रेंगाळणारी...

Churti Churma Ladu Recipe How To Make Churti Churma Ladu At Home Shravan Special Food Churti Churma Ladu Recipe | श्रावण स्पेशल : चुरटी चुरम्याच्या लाडूची पारंपरिक रेसिपी, प्रसाद म्हणून खावा असा सुंदर पदार्थ...

श्रावण स्पेशल : चुरटी चुरम्याच्या लाडूची पारंपरिक रेसिपी, प्रसाद म्हणून खावा असा सुंदर पदार्थ...

श्रावण महिना म्हणजे पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या रेशीम धारा, ऊनपावसाचा खेळ. निसर्ग जणू मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण करत असतो. या महिन्यात पूजाअर्चा , व्रतवैकल्ये , उपासतापास यांना कमीच नाही. मला आठवतो तो बालपणीचा श्रावण. श्रावणात घराघरातून शिरा, पुरण, नागपंचमीला पुरणाचे उकडीचे दिंड,नारळीभात (Churti Churma Ladu Recipe) असे नैवेद्यासाठी विविध पदार्थ केले जात.

माझ्या आजीची  ग्रामदैवत नागनाथावर फारच श्रद्धा होती. नैवेद्यासाठी ती पोळीचा चुरटी चुरम्याचा लाडू आवर्जून करीत असे. मलासुद्धा तिच्या हातचा चांगल्या तुपातील तो लाडू फार (How To Make Churti Churma Ladu At Home) आवडत असे. आजही चुरटी चुरम्याचा लाडू मी देवाच्या नैवेद्यासाठी करते आणि नकळतच आजीच्या आठवणींनी माझे डोळे पाणावतात(Shravan Special Food Churti Churma Ladu Recipe).

कसे करायचे लाडू?

गव्हाचे पीठ अंदाजे दीड ते दोन वाट्या , बारीक केलेला गुळ अर्धी वाटी, अर्धी वाटी शुद्ध तूप गरम करून घेतलेले, वेलची पावडर अर्धा चमचा

कृती :- 
प्रथम गव्हाचे पीठ नीट चाळून , थोडेसे मीठ व तेल घालून थोड्या पाण्यात मळून घ्यावे व वरून थोडेसे तेल लावून साधारणतः अर्धा तास झाकून ठेवावे .
नंतर नेहमी बनवतो तशी पोळी बनवून घ्यावी. साधारणतः 3 ते 4 पोळ्या तयार होतील.भाजताना त्या थोड्या कडक भाजाव्यात .
नंतर गरम पोळ्या बारीक कुस्करून त्यावर तूप, गूळ , वेलची पावडर व घालून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावात. 

त्याचे छान हवे त्या आकाराचे लाडू बांधून घ्यावे .
हे लाडू रोजच्या स्वयंपाकात सहज बनवता येतात. लहान मुलांना खाऊ म्हणून लाडू देता येतात. पचायला अगदी हलके आणि चविष्ट असे हे लाडू सौम्य चवीचे असतात. आजकाल अती गोड खाण्याची सवय झालेल्या आपल्या जिभेला हे लाडू म्हणूनच वेगळे लागतील आणि पारंपरिक पदा‌र्थ खाण्याचा आनंदही देतील. 

- माधुरी मनोज कुलकर्णी (नागापूरकर )
    - अंबाजोगाई. जि. बीड

Web Title: Churti Churma Ladu Recipe How To Make Churti Churma Ladu At Home Shravan Special Food Churti Churma Ladu Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.