Join us

ख्रिसमस स्पेशल: स्नोबॉल कुकीज बनवण्याची सोपी झटपट रेसिपी, मुलंही होतील खुश- खा मस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 15:30 IST

Christmas Special ख्रिसमस म्हटलं, की केक, कुकीज, पेस्ट्री, कपकेक आलेच. यासह स्नोबॉल कुकीज बनवा, काहीतरी हटके मुलांना नक्की आवडेल..

डिसेंबर महिना सुरु झाला, की नाताळ आणि नवीन वर्षाची चाहूल लागते. काही मुलांना या दिवसात चविष्ट आणि गोड धोड खाण्याची इच्छा प्रचंड होते. केक, चोकलेट, पेस्ट्री, किंवा इतर काही आपण या दिवसात आपल्या घरातील सदस्यांसाठी विशिष्ट पदार्थ बनवतो. आज आपण असाच काहीसा हटके पदार्थ बनवणार आहोत. आपल्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी खास स्नोबॉल कुकीज बनवा. केक, कपकेक आणि पेस्ट्रीसह हे स्नोबॉल कुकीज मुलांना प्रचंड आवडतील. त्याची रेसिपी..

स्नोबॉल कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य

एक कप मैदा 

एक चमचा कॉर्नफ्लोअर

एक कप पिठीसाखर

अर्धा कप बटर 

एक छोटा चमचा बेकिंग पावडर 

अर्धा छोटा चमचा मीठ 

कृती

स्नोबॉल कुकीज बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बटर घ्या. त्यात एक कप पिठीसाखर टाका. या दोन्ही साहित्यांना चांगले मिक्स करा. क्रिमी बॅटर तयार झाल्यानंतर त्यात मैदा मिक्स करा. यासह त्यात कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा आणि मीठ टाका. आणि सर्व मिश्रण ब्लेंडर अथवा हाताने मिक्स करा. 

मिश्रण तयार झाल्यानंतर त्यावर प्लेट झाकून २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेऊन द्या. दुसरीकडे बेकिंग ट्रे ला बटर अथवा तेलाने ग्रीस करून घ्या. २० मिनिटे झाली की कुकीजचं मिश्रण फ्रिजमधून बाहेर काढा. आणि त्याला छोटे छोटे कुकीजचे आकार द्या, आणि बेकिंग ट्रे वर ठेवून द्या. नंतर या कुकीज ओव्हनमध्ये १७० डिग्री सेल्सिअसवर बेक करा.

कुकीज १५ ते २० मिनिटांनंतर बाहेर काढा. थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये सगळे कुकीज बाहेर काढून घ्या. सजावटीसाठी आपण त्यावर पिठीसाखर टाकून सजवू शकताे. अशा प्रकारे स्नोबॉल कुकीज खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :नाताळअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स