Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > गुलाबी थंडीत खा चिंचेचा चटपटीत भात! रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट वन डिश मील, रेसिपी अगदीच सोपी

गुलाबी थंडीत खा चिंचेचा चटपटीत भात! रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट वन डिश मील, रेसिपी अगदीच सोपी

South Indian Style Tamarind Rice Recipe: रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकंफुलकं पण चटपटीत खायचं असेल तर चिंचेच्या भाताची रेसिपी ट्राय करून पाहा..(how to make tamarind rice?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2025 11:38 IST2025-11-11T11:37:48+5:302025-11-11T11:38:30+5:30

South Indian Style Tamarind Rice Recipe: रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकंफुलकं पण चटपटीत खायचं असेल तर चिंचेच्या भाताची रेसिपी ट्राय करून पाहा..(how to make tamarind rice?)

chinchecha bhaat recipe, how to make tamarind rice, south Indian style tamarind rice recipe  | गुलाबी थंडीत खा चिंचेचा चटपटीत भात! रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट वन डिश मील, रेसिपी अगदीच सोपी

गुलाबी थंडीत खा चिंचेचा चटपटीत भात! रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट वन डिश मील, रेसिपी अगदीच सोपी

Highlightsदक्षिण भारतात हा पदार्थ नेहमीच करतात. रेसिपी अगदी सोपी असून चव तर एकदम झकास आहे.

रात्रीच्या वेळी बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खूप भूक नसते. अगदी थोडंसं खाण्याची इच्छा असते. पण ते थोडंसं अगदी चटपटीत, चवदार असावं असं वाटतं. काही वेळेला असंही होतं की दिवसभराची कामं उरकून आपण खूप जास्त थकलेलो असतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी पोळी, भाजी असा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. पण त्याचवेळी जेवणात असंही काहीतरी हवं असतं ज्यामुळे सगळ्यांचं पोट व्यवस्थित भरू शकेल.. अशा वेळी तुम्ही नक्कीच चिंचेच्या भाताची रेसिपी ट्राय करून पाहा. दक्षिण भारतात हा पदार्थ नेहमीच करतात (South Indian Style Tamarind Rice Recipe). त्याची रेसिपी अगदी सोपी असून चव तर एकदम झकास आहे.(how to make tamarind rice?)

चिंचेचा भात करण्याची रेसिपी

 

साहित्य :

शिजवून घेतलेला भात अडीच ते ३ वाट्या..

२ टेबलस्पून चिंच

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद आणि कडिपत्ता

आवळ्याची चटकमटक चटणी- करायला सोपी आणि चवीला लय भारी, घ्या टेस्टी रेसिपी...

१ टीस्पून उडीद डाळ

२ ते ३ सुकलेल्या लाल मिरच्या

१ टीस्पून शेंगदाणे

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस

चवीनुसार मीठ

 

कृती :

चिंचेचा भात करण्यासाठी भात वेगळा शिजवून घ्यावा. भात थोडा मोकळा शिजवावा. पाणी जास्त झालेला गचका भात या रेसिपीमध्ये चांगला लागत नाही. 

यानंतर चिंच गरम पाण्यात भिजवून तिचा कोळ काढून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता, हळद घालून फोडणी करून घ्या.

थंडीमुळे पाय कोरडे पडू लागले- तळपायांच्या भेगा वाढल्या? 'हा' होममेड फुटमास्क लावा- पाय होतील मऊ

फोडणी झाल्यानंतर शेंगदाणे आणि उडीदडाळ हलकेसे तळून घ्या. आता त्यामध्ये लाल मिरच्या आणि चिंचेचा कोळ घाला. हे मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या आणि त्यानंतर त्यामध्ये शिजवलेला भात घाला. चवीनुसार मीठ घालून थोडी वाफ येऊ द्या. चिंचेचा गरमागरम भात तयार. हा भात सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घालून सर्व्ह करा.  


 

Web Title : खट्टी इमली का चावल: रात के खाने के लिए झटपट, स्वादिष्ट व्यंजन

Web Summary : रात के खाने के लिए कुछ स्वादिष्ट और आसान खाने का मन कर रहा है? इमली का चावल आजमाएं! यह दक्षिण भारतीय-प्रेरित व्यंजन बनाना आसान है। चावल पकाएं, मसालों के साथ एक खट्टी इमली की चटनी तैयार करें और मिलाएं। स्वादिष्ट भोजन के लिए धनिया और नारियल से सजाएँ।

Web Title : Tangy Tamarind Rice: A Quick, Flavorful One-Dish Meal for Dinner

Web Summary : Craving something tasty and easy for dinner? Try tamarind rice! This South Indian-inspired dish is simple to make. Cook rice, prepare a tangy tamarind sauce with spices, and mix. Garnish with coriander and coconut for a flavorful, satisfying meal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.