Join us

Chilli chutney : पावसाळ्यात फक्त हिरवी मिरची अन् कोथिंबिर वापरून बनवा; 'या' ३ प्रकारच्या चटपटीत चटण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 13:38 IST

Food Tips chilli chutney : भारतात हिरव्या मिरच्या कच्च्या खाण्याची प्रथा आहे जिथे ती पराठा, समोसा, भजी, कचोरी इत्यादी बरोबर खाल्ले जाते. पण एक असा पदार्थ आहे ज्याची चव प्रत्येकाला आवडते ती म्हणजे हिरव्या मिरचीची चटणी.

हिरवी मिरची जेवणाचा स्वाद वाढवण्याचं काम करते. चटणी, भाजी  किंवा कोणत्याही चटपटीत पदार्थांला मिरचीची फोडणी दिली की त्याची चव दुप्पटीनं वाढते. जर तुम्ही मसालेदार पदार्थ आवडणाऱ्यांपैकी असाल तर तुम्हाला हिरव्या मिरचीची चव नक्कीच आवडेल. भारतात हिरव्या मिरच्या कच्च्या खाण्याची प्रथा आहे.  पराठा, समोसा, भज्या, कचोरी इत्यादी बरोबर खाल्ले जाते. पण एक असा पदार्थ आहे ज्याची चव प्रत्येकाला आवडते ती म्हणजे हिरव्या मिरचीची चटणी.  उन्हाळ्याच्या दिवसता कैरी घालून, पावसाळ्यात पुदीना घालून  हिरव्या मिरचीची चटणी तयार केली जाते. यापैकी काही मिरचीच्या चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. 

१) हिरवी चटणी

२-३ हिरवी मिरची, १ कप पुदीना पान, १ कप कोथिंबीर चिरलेली, १ टिस्पुन लिंबुरस, , १/२ टिस्पुन काळ मिठ, १ टिस्पुन जिरंपुड.

कृती

वरील सर्व साहित्य १/४ कप पाणि घालून मिक्सर मध्ये फिरवून बनवून घ्या. त्यानंतर वाटल्यास मोहोरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता. तयार आले झटपट हिरवी चटणी.

२) तिळाची हिरवी चटणी

१ कप पांढरे तीळ, ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, १ कप कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, चवीपूरतं मीठ, १ चमचा जीरे

कृती

सगळ्यात आधी तिळ व्यवस्थित भाजून घ्या नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. त्यात लसणाच्या पाकळ्या,कोथिंबीर हिरवी मिरची, मीठ, जीरं टाकून चांगले वाटून घ्या, नंतर त्यात लिंबाचा रस टाका. गरज लागली तर थोडे पाणी टाका आणि चांगलं घट्ट वाटून घ्या तयार आहे आपली तिळाची चटणी. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही भजी, वड्यांसोबत किंवा जेवताना तोंडी लावायला या चटणीचा आनंद घेऊ शकता. 

३) मिरची तुळशीची चटणी

ग्रॅम तुळशीची पानं, 100 ग्रॅम कोथिंबीर, दोन कांदे चिरलेले,दोन सफरचं सोलून चिरलेले, एक मिरची, एक चमचा मीठ, दोन इंच आलं दोन चमचे चिंचेचा कोळ ही सामग्री लागते.

कृती

हे सर्व साहित्य मिक्सरला लावून छान बारीक करुन घ्यावं. ही चटणी फ्रीजमधे ठेवल्यास बर्‍याच दिवस टिकते. तुळशीची पानं, कांदा, आलं, कोथिंबिर आणि सफरचंद या जिन्नसातून तयार होणारी ही चटणी  करायला फक्त 15 मिनिटं लागतात. ही चटणी जेवताना तोंडी लावायला मस्त पर्याय आहे. याशिवाय कबाब, डोसा, इडलीसह खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

टॅग्स :अन्नपाककृती