Lokmat Sakhi >Food > एका मिनिटांत काढा किलोभर भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं! रणबीर ब्रारची पाहा १ भन्नाट ट्रिक...

एका मिनिटांत काढा किलोभर भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं! रणबीर ब्रारची पाहा १ भन्नाट ट्रिक...

Chef Ranveer Brar Shares Quick & Easy Tips To Remove Peanut Skin : How to easily remove peanut skins : Peanut peel is not easily removed, this 1 simple trick of Chef Ranbir Brar will work, try it : शेंगदाणे भाजले की कुट करण्यापूर्वी काहीजण त्यांची टरफलं काढतात, पण त्यासाठीचा वेळ वाचवायचा तर वापरा ही ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 18:33 IST2025-05-20T17:23:53+5:302025-05-20T18:33:52+5:30

Chef Ranveer Brar Shares Quick & Easy Tips To Remove Peanut Skin : How to easily remove peanut skins : Peanut peel is not easily removed, this 1 simple trick of Chef Ranbir Brar will work, try it : शेंगदाणे भाजले की कुट करण्यापूर्वी काहीजण त्यांची टरफलं काढतात, पण त्यासाठीचा वेळ वाचवायचा तर वापरा ही ट्रिक...

Chef Ranveer Brar Shares Quick & Easy Tips To Remove Peanut Skin How to easily remove peanut skins Peanut peel is not easily removed, this 1 simple trick of Chef Ranbir Brar will work, try it | एका मिनिटांत काढा किलोभर भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं! रणबीर ब्रारची पाहा १ भन्नाट ट्रिक...

एका मिनिटांत काढा किलोभर भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं! रणबीर ब्रारची पाहा १ भन्नाट ट्रिक...

अनेक पदार्थ तयार करण्यासाठी आपण त्यात शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा कूट घालतो. पदार्थांत शेंगदाणे घातल्याने त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते. चटणी, भाजी, लाडू, स्नॅक्स किंवा पोहे, उपमा असे पदार्थ तर शेंगदाण्याशिवाय अधुरेच आहेत. शेंगदाणे जरी पदार्थांची चव दुपटीने वाढवण्यास मदत करत असतील, तरी शेंगदाणे भाजून त्यांची टरफलं (Chef Ranveer Brar Shares Quick & Easy Tips To Remove Peanut Skin) काढून ते सोलणे सर्वात कंटाळवाणे काम वाटते. अनेकजणी शेंगदाण्याचे कूट (Peanut peel is not easily removed, this 1 simple trick of Chef Ranbir Brar will work, try it) वारंवार लागते, यासाठी एकदम एकाचवेळी शेंगदाणे सोलून त्याचे कूट तयार करून ठेवतात. परंतु अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शेंगदाणे सोलायचे असतील, तर ती प्रक्रिया अधिक कंटाळवाणी वाटू लागते(How to easily remove peanut skins).

असे असले तरी काही स्मार्ट आणि घरगुती उपायांनी हेच कामं आपण अगदी सहज, झटपट आणि किचनमध्ये घोळ न करता करू शकता. यासाठी गरज आहे ती फक्त योग्य ट्रिकची! शेंगदाण्याची टरफलं झटपट, सोप्या पद्धतीने आणि कष्ट न करता कशी काढता येतील, याची सोपी ट्रिक सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रारने इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच शेअर केली आहे. शेंगदाण्यांची टरफलं काढण्यासाठी जर तुम्ही ही साधीसोपी ट्रिक वापरली तर, तुमचा वेळही वाचेल आणि कामही झटपट व्यवस्थित होईल.

शेंगदाणे सोलण्याची सोपी पद्धत... 

कच्चे शेंगदाणे असो किंवा भाजलेले, आपल्यापैकी बरेचेसजण शेंगदाण्याचे साल काढून खाणे पसंत करतात. शेंगदाणे सोलण्यासाठी आपण सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रारने सांगितलेली ही ट्रिक वापरून पाहू शकता. यासाठी सर्वप्रथम, एका मोठ्या कढईत शेंगदाणे हलके भाजून घ्या. आता एक कापड घ्या. या कापड्यात भाजलेले शेंगदाणे ओतून कापडाची चारही टोकं एका हातात बरोबर मध्यभागी पकडून धारावी. त्यानंतर हाताने घट्ट पकडून त्यावर दाब देताना दुसऱ्या हाताने कापड धुताना जसे चोळतो तसे चोळून शेंगदाण्याचे साल काढण्याचा प्रयत्न करा.

शिळ्या पोळ्या आणि डाळीचे डोसे? विश्वास नाही बसणार पण ‘असे’ डोसे करुन पाहा, कोंड्याचा मांडा...

यंदाच्या उन्हाळ्यात करा कैरीची आंबट गोड कँडी, करायला सोपी - चवीला उत्तम...

शेंगदाणे जर गरम असतील तर, त्याचे साल झटपट निघतील. जर साल लवकर निघत नसतील तर, आपण त्यात मीठ मिक्स करू शकता. शेंगदाण्यात मीठ मिक्स केल्याने मिठाच्या खरखरीतपणामुळे घर्षण होते, आणि यामुळेच सालं अगदी झटपट निघण्यास मदत होते. आता शेंगदाणे एका ताटात घ्या, फुक मारून साल आणि शेंगदाणे वेगळे करा. अशा प्रकारे झटपट शेंगदाण्यातून साल वेगळे होईल. याचबरोबर, आपण मोठी चाळणी देखील घेऊ शकता, या चाळणीत सोलून घेतलेले शेंगदाणे घालून चाळून घातल्याने देखील आपण शेंगदाणे आणि टरफलं वेगवेगळी करु शकता. अशाप्रकारे, आपण ही सोपी ट्रिक वापरुन अगदी १० ते १५ मिनिटांत किलोभर शेंगदाण्याची टरफलं अगदी काही मिनिटांत काढू शकता.


Web Title: Chef Ranveer Brar Shares Quick & Easy Tips To Remove Peanut Skin How to easily remove peanut skins Peanut peel is not easily removed, this 1 simple trick of Chef Ranbir Brar will work, try it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.