Holi Special Traditional Foods: आपल्या प्रत्येक सणामागे एक गोष्ट लपलेली आहे. काही मान्यता आहेत. ( Check out these 4 tips to make the perfect Puran Poli)काही दंतकथाही आहेत. प्रत्येक सण नाविन्यपूर्ण असतो. पारंपारिक सण साजरे करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. एवढंच नाही तर कोणत्या सणाला कोणते कपडे वापरायचे हे ही ठरलेले आहे. ( Check out these 4 tips to make the perfect Puran Poli)त्याच प्रमाणे प्रत्येक सणाला वेगळे पदार्थ तयार केले जातात. सगळ्या सणांना काहीतरी खास पदार्थ ठरलेला असतो. त्यानुसार मग घरी बेत आखला जाते.
होळीच्या दिवशी आपल्याकडे मस्त पुरणपोळी तयार केली जाते. घरोघरी माळ्यावर टाकलेले पुरणयंत्र माळ्यावरून खाली काढले जाते. ( Check out these 4 tips to make the perfect Puran Poli)मस्त मऊ पुरण तयार करून नंतर पोळ्या लाटल्या जातात. मग घरभर त्या पोळीचा सुगंध परतो. वाहह!! विचार करूनच तोंडाला पाणी सुटले. पण पुरणपोळी तयार करणे खाण्याएवढे सोपे नाही. ती बरेचदा फसते. मग अगदीच पचका झाल्यासारखा वाटते. कधी पुरण पातळ होतं, तर कधी आपण डाळ भिजवायला विसरून जातो. कधी पोळी पाोलपाटाला चिकटते, तर कधी लाटलीच जात नाही. काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा पोळी फसूच शकत नाही.
१. पुरण तयार करताना चांगल्या ६ ते ७ शिट्या काढून घ्या. म्हणजे चणा डाळ छान शिजते. नंतर तिचे पाणी काढून घ्यायचे. जरा सुकी करून घ्यायची. म्हणजे ती छान एकजीव होते. पाणी तसेच राहीले तर पुरण पातळ होते.
२. पीठासाठी मैदा आणि कणीक हे मिश्रण वारण्याची पद्धतीने वापरत असाल तर, तेल व पाण्याचे प्रमाण अगदीच योग्य घ्या. ते पुढे मागे झालं तर लाट्या चांगल्या होणार नाहीत. पीठ नीट तिंबून घ्या.
३. पोळी लाटताना जर चिकटत असेल तर, थोडं तांदळाचं पीठ वापरून लाटा. तांदळाच्या पीठामुळे पोळी न चिकटता लाटली जाते. नंतर ते पीठ पोळीवर रूमालाच्या मदतीने आरामात काढून टाकता येते.
४. अनेक जण पोळीवर भरपूर तूप घालतात. पोळी दोन्ही बाजूनी अति तुपावर परतल्यावर ती नंतर कडक होते. तुपही करपू शकते. त्यामुळे पोळी भाजताना योग्य तेवढंच तूप वापरा. नंतर खाताना वरतून हवं तेवढं तूप ओता. अनेक जण पोळी तयार करताना तूप वापरतही नाहीत.