Lokmat Sakhi >Food > तूप-भात-पालक पचडी, जेवण म्हणजे अहाहा! पाहा पालक पचडी करण्याची मस्त हिरवीगार रेसिपी

तूप-भात-पालक पचडी, जेवण म्हणजे अहाहा! पाहा पालक पचडी करण्याची मस्त हिरवीगार रेसिपी

Check out the delicious recipe for making spinach pachadi : उन्हाळ्यात झटपट करा ही पालक पचडी. पौष्टिक रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 15:54 IST2025-05-09T15:53:08+5:302025-05-09T15:54:12+5:30

Check out the delicious recipe for making spinach pachadi : उन्हाळ्यात झटपट करा ही पालक पचडी. पौष्टिक रेसिपी.

Check out the delicious recipe for making spinach pachadi | तूप-भात-पालक पचडी, जेवण म्हणजे अहाहा! पाहा पालक पचडी करण्याची मस्त हिरवीगार रेसिपी

तूप-भात-पालक पचडी, जेवण म्हणजे अहाहा! पाहा पालक पचडी करण्याची मस्त हिरवीगार रेसिपी

भाताबरोबर खाण्यासाठी अनेक प्रकारच्या आमटी आणि वरण आपण करतो. इतरही काही पदार्थ असतात. (Check out the delicious recipe for making spinach pachadi)जे भाताशी तोंडी लावायला आपण खातो. मात्र हा पालकाचा पदार्थ एकदा भाताबरोबर खाल्ला की पुन्हा नक्की कराल. पालकाची पचडी मस्त पौष्टिक असते तसेच चवीला कमाल लागते. करायला अगदी सोपी. 

साहित्य 
पालक, कांदा, टोमॅटो, तूप, लाल मिरची, मीठ, मोहरी, पांढरे तीळ, चणा डाळ, जिरे, कडीपत्ता, पाणी, लसूण, चिंच, हिंग  

कृती
१. पालकाची भाजी निवडून घ्या. (Check out the delicious recipe for making spinach pachadi)निवडून झाल्यावर पालक छान स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे पाणी निथळवा आणि मग पालक बारीक चिरुन घ्या. 

२. कांद्याचे छान तुकडे करुन घ्या. बारीक चिरायची गरज नाही. चिंच भिजत घाला अगदी थोडीशी चिंच वापरायची. टोमॅटोचेही मोठे तुकडे करुन घ्या. लसाणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. 

३. एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे घ्यायचे. कांद्या सारखेच टोमॅटोचेही तुकडे भांड्यात घ्या. सोललेला लसूण घ्यायचा. तसेच भिजवलेली चिंच घ्या. चिंचेची बी काढून टाका आणि फक्त गर घ्यायचा. मिक्सरमधून ते वाटून घ्या. छान पेस्ट करुन घ्या. सगळे पदार्थ नीट वाटले जातील याची काळजी घ्या. 

४. एका कढईत चमचाभर तूप घ्या. तुपात मोहरी घाला आणि छान तडतडू द्या. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घालायचं. जिरंही मस्त फुलेल मग त्यात कडीपत्याची पाने घाला. एकदा ढवळून घ्या. नंतर चणा डाळ घाला आणि खमंग परतून घ्या. डाळ परतल्यावर त्यात पांढरे तीळ घालायचे. तीळ परतून घ्यायचे. थोडं हिंग घाला आणि परतून घ्या. शेवटी तयार केलेली पेस्ट त्यात घाला पेस्ट छान परता. 

५. पेस्ट परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला पालक घालायचा. त्यात थोडे पाणी घालायचे. अगदी थोडेच पाणी घाला आणि झाकण ठेऊन वाफवून घ्या. सगळे पदार्थ खमंग परतायचे. पालक शिजू द्यायचा. मग गॅस बंद करुन भातासोबत किंवा पोळी सोबत पचडी खायची.     

Web Title: Check out the delicious recipe for making spinach pachadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.