Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > १ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी

१ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी

Chana Dal Chutney/ Side Dish for Idli, Dosa/ Chutney Recipes खोबऱ्याची चटणी - सांबार खाऊन कंटाळा आला असेल तर, ट्राय करा चमचमीत चणा डाळीची चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2023 11:27 IST2023-09-04T11:26:23+5:302023-09-04T11:27:33+5:30

Chana Dal Chutney/ Side Dish for Idli, Dosa/ Chutney Recipes खोबऱ्याची चटणी - सांबार खाऊन कंटाळा आला असेल तर, ट्राय करा चमचमीत चणा डाळीची चटणी

Chana Dal Chutney/ Side Dish for Idli, Dosa/ Chutney Recipes | १ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी

१ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी

जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी हवीच. स्नॅक्स व इतर पदार्थाची चव वाढवण्याचं काम चटणी करते. ओली असो किंवा सुकी, चटणी आवडीने खाल्ली जाते. चटणी अनेक प्रकारची केली जाते. खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाची चटणी आपण खाल्लीच असेल. साऊथ इंडियन पदार्थांसोबत खोबऱ्याची चटणी आणि सांबार खाऊन कंटाळा आला असेल तर, चणा डाळीची चटणी करून पाहा.

चणा डाळीचा वापर आपण भाजी किंवा पूरणपोळी करण्यासाठी करतो. पण क्वचितच कोणी चणा डाळीची चटणी खाऊन पाहिली असेल. चणा डाळीची चटणी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते. चला तर मग चणा डाळीची चटणी कशी तयार करायची पाहूयात(Chana Dal Chutney/ Side Dish for Idli, Dosa/ Chutney Recipes).

चणा डाळीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

चणा डाळ

कडीपत्ता

लाल सुक्या मिरच्या

कांदा

लसणाच्या पाकळ्या

काश्मिरी लाल तिखट

साबुदाणा न भिजवताही करा उत्तम साबुदाणा खिचडी, १ ट्रिक - करा झटपट खिचडी

खोबरं

चिंच

जिरं

मोहरी

हिंग

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक कप चणा डाळ घालून भाजून घ्या. चणा डाळीला छान सोनेरी रंग आल्यानंतर, त्यात कडीपत्ता आणि ४ ते ५ लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या. साहित्य भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवा.

१ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, एक कप किसलेलं खोबरं, एक चमचा चिंच घालून भाजून घ्या. साहित्य भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा. व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पेस्ट तयार करा.

चणा डाळीची तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर तडका देण्यासाठी, फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमुटभर हिंग आणि कडीपत्ता घालून तडका चटणीवर पसरवा. अशा प्रकारे चमचमीत चणा डाळीची चटणी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Chana Dal Chutney/ Side Dish for Idli, Dosa/ Chutney Recipes