दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाचा सुगंध पसरतो. लाडू, करंजी, शंकरपाळे असे विविध पदार्थ केले जातात. मात्र चकली ही एक खास लोकप्रिय डिश असते. सगळ्यात जास्त खप चकलीचाच होतो. कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारी चकली सर्वांनाच आवडते. पण अनेकदा ती जास्त तेलकट होते किंवा बिघडते. (Chakli will not spoil this year - fry and eat delicious chakli, remember very simple rule)चकलीचा रंग अगदीच गडद लाल झाला म्हणजे ती करपते. त्याला वासही जरा वेगळा येतो आणि चवही बिघडते. काही सोप्या उपायांनी आपण हे सहज टाळू शकतो.
१. चकली करताना प्रथम तिचं पीठ योग्य प्रमाणात मळणं महत्त्वाचं आहे. पीठ खूप घट्ट झालं तर चकली कडक होते आणि खूप सैल असेल तर ती तुटते किंवा जास्त तेल शोषते. म्हणून मध्यम मऊ, लवचिक पीठ तयार करायचे. पीठ मळताना त्यात गरम तेल किंवा तूप घालायचे. चकली सारख्या पदार्थांसाठी मोहन घालणे फार महत्वाचे असते. त्यामुळे चकली कुरकुरीत होते आणि तेल कमी शोषते.तसेच पिठही छान एकजीव होते.
२. तळताना तेलाचं तापमान योग्य ठेवणं फार गरजेचं आहे. तेल खूप गरम असेल तर चकली बाहेरुन करपते आणि आतून कच्ची राहते. तेल थंड असेल तर ती जास्त तेल शोषते. त्यामुळे मध्यम आचेवर तळणं योग्य ठरतं. तळताना एकावेळी फार चकल्या न तळता काही काही करुन तळाव्यात. त्यामुळे तेलाचं तापमान टिकून राहतं आणि चकल्या सुंदर सोनेरी रंगाच्या होतात.
३. चकली तळताना ती थोडी सोनेरी झाली की लगेच बाहेर काढावी. जास्त वेळ ठेवल्यास ती करपते आणि तिचा रंग व चव दोन्ही बिघडतात. तयार चकल्या थंड झाल्यावरच डब्यात भराव्यात, जास्त वेळ चकली बाहेर राहिली तर ओलसर होतात आणि कुरकुरीतपणा जातो. तसेच मऊ पडतात. अशा या छोट्या-छोट्या टिप्स लक्षात घेतल्या तर तुमच्या हातच्या चकल्या नक्कीच परफेक्ट होतील. ना तेलकट, ना करपलेल्या, अगदी खुसखुशीत आणि स्वादिष्ट!
Web Summary : Avoid oily or burnt chaklis this Diwali! Proper dough consistency, medium-hot oil, and timely removal are key. Fry in batches until golden brown. Cool completely before storing for crispiness.
Web Summary : इस दिवाली तैलीय या जली हुई चकली से बचें! सही आटा स्थिरता, मध्यम गरम तेल और समय पर निकालना महत्वपूर्ण है। सुनहरा भूरा होने तक बैचों में भूनें। कुरकुरापन के लिए स्टोर करने से पहले पूरी तरह ठंडा करें।