उन्हाळा आता सुरू झालेला आहे. दुपारी भरपूर ऊन असतं. शिवाय दिवसभर पंखा लावावाच लागतो. त्यामुळे उन्हाळ्याची तयारी आता घरोघरी सुरू झालेली आहे. उन्हाळ्याचं एक खास आकर्षण म्हणजे खास उन्हाळी पदार्थ. यामधलाच एक पदार्थ म्हणजे गारेगार मठ्ठा. आता आपण ताक नेहमीच पितो. पण उन्हाळ्यात मात्र गारेगार मठ्ठा आवर्जून प्यावा वाटतो. हा मठ्ठा करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे (Summer Special Maththa Recipe). असा मठ्ठा जर तुम्ही रोज करून प्यायलात तर रसनातृप्तीही होईल आणि उन्हाळ्यात शरीराला कित्येक लाभही मिळतील.(how to make maththa for summer?)
उन्हाळा स्पेशल गारेगार मठ्ठा करण्याची रेसिपी
मठ्ठा करण्यासाठी जर तुमच्याकडे २ ग्लास ताक असेल तर त्यासाठी पुढे सांगितलेल्या प्रमाणात बाकीचे साहित्य वापरावे. त्यासाठी सगळ्यात आधी २ ते ३ टीस्पून जिरे घ्या. १ इंच आल्याचा तुकडा घ्या आणि २ ते ३ हिरव्या मिरच्या घ्या.
कैरी आणि कच्च्या कांद्याची चटपटीत इंस्टंट चटणी- अशी चवदार की भाजी, आमटीची आठवणही येणार नाही
कोथिंबीरीचा हलकासा स्वाद मठ्ठ्याची चव आणि रंग दोन्हीही खुलवून टाकतो. त्यामुळे २ ते ३ टेबलस्पून कोथिंबीरही घ्या. आता जिरे, आलं, मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्या.
आता ही पेस्ट गाळून घ्या. कारण मठ्ठा पिताना दाताखाली मिरच्या, आलं, कोथिंबीर, जिरे यांचे तुकडे आलेले अनेकांना आवडत नाही. त्यामुळे ही पेस्ट नेहमी गाळून घ्या आणि त्यातून येणारं पाणी ताकामध्ये घाला.
कशाला महागडे हेयर डाय पाहिजेत? डाळिंब - बिटाचा घरीच तयार करा केसांसाठी मस्त बरगंडी रंग
आता ताकामध्ये थोडीशी साखर, सैंधव मीठ, चाट मसाला, थोडंसं साधं मीठ असं सगळं घाला आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. यामध्ये काही बर्फाचे तुकडे घातले की गारेगार मठ्ठा झाला तयार...
Web Summary : This summer, enjoy a cooling and delicious Maththa. The recipe involves blending ginger, chilies, coriander, and cumin into a paste, straining it, and adding it to buttermilk with sugar, salt, chaat masala, and ice. This traditional drink provides relief and flavor in the summer heat.
Web Summary : इस गर्मी में, एक ठंडे और स्वादिष्ट मठ्ठे का आनंद लें। अदरक, मिर्च, धनिया और जीरा को मिलाकर पेस्ट बना लें, छान लें और छाछ में चीनी, नमक, चाट मसाला और बर्फ डालकर मिलाएं। यह पारंपरिक पेय गर्मी में राहत और स्वाद प्रदान करता है।