Carrot and Tomato Soup : हिवाळ्यात बाजारात भरपूर वेगवेगळी फळं आणि भाज्या मिळतात. या दिवसांमध्ये गाजरही भरपूर मिळतात. लोक गाजराचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातात. गाजरं आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. सोबतच टोमॅटोही टेस्टी आणि हेल्दी असतात. अशात जर थंडीत गाजर आणि टोमॅटोचं गरमागरम हेल्दी आणि टेस्टी सूप मिळालं तर काय मज्जा येईल ना? नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर गाजर आणि टोमॅटोचं खास सूप तयार करू शकता. जे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
गाजर आणि टोमॅटो दोन्ही गोष्टी हेल्दी आणि टेस्टी आहेत. दोन्ही एकत्र करून यांचं सूप तयार केलं तर यातून दुप्पट पोषक तत्व शरीराला मिळतील. गाजर आणि टोमॅटो दोन्हींमध्ये व्हिटॅमिन ए असतं. त्यामुळे या दोन्हींचं मिश्रण करुन तयार केलेलं हे सूप चांगलंच फायदेशीर ठरु शकतं.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर सूप
गाजर आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. तसेच यात कॅलरी कमी असतात. हे सूप प्यायल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. टोमॅटोमधील अमीनो अॅसिडनं फॅट बर्न करण्यासही मदत मिळते. हे सूप तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी पिऊ शकता. या सूपच्या मदतीने अनेक आजारांचा धोकाही टाळता येतो.
सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य?
1/2 किलो टोमॅटो
200 ग्रॅम गाजर बारीक किसलेले
चवीनुसार मीठ
1/4 छोटा चमचा काळी मिरी
1 चमचा साखर
कसं कराल तयार?
टोमॅटो आणि गाजर धुवून कापा. एक कप पाण्यात मीठ टाका आणि त्यात गाजर-टोमॅटो उकडून घ्या. गाजर आणि टोमॅटो चांगल्याप्रकारे शिजू द्या. नंतर ते थंड होऊ द्या. त्यानंतर या गोष्टी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा आणि चाळणीने गाळून घ्या. सूप पातळ करण्यासाठी यात अर्धा कप पाणी टाका. हे सुद्धा कमी आसेवर उकडू द्या. आता यात साखर आणि काळी मिरी टाका. त्यानंतर आणखी १० मिनिटांसाठी उकडू द्या. नंतर एका वाटीमध्ये हे सूप काढून त्यावर थोडं क्रिम टाका आणि सूपचा आनंद घ्या.