High Cholesterol : हाय कोलेस्टेरॉलची समस्या आजकाल भरपूर लोकांना होत आहे. लठ्ठपणा, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, सुस्त लाइफस्टाईल, डायबिटीस, मद्यसेवन, स्मोकिंग यामुळे लोकांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढत आहे. कोलेस्टेरॉल वाढलं की, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचं असतं एक बॅड कोलेस्टेरॉल आणि दुसरं गुड कोलेस्टेरॉल. हा एक मेणासारखा चिकट पदार्थ असतो, जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. गुड कोलेस्टेरॉल शरीरातील वेगवेगळ्या क्रियांसाठी आवश्यक असतं. तर बॅड कोलेस्टेरॉलनं हृदयरोगांचा धोका असतो.
जॉन्स हॉपकिन्स मेडिसीननुसार, सध्या जवळपास ७१ मिलियन अमेरिकन लोक हाय कोलेस्टेरॉलनं पीडित आहेत. तेच भारतात साधारण ३१ टक्के लोकांना ही समस्या आहे. कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यासाठी डाएट आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. कोलेस्टेरॉल वाढलं की, जास्त तेकलट, भाजलेले, मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशात कोलेस्टेरॉल वाढल्यावर कॉफी पिणं सेफ आहे की नाही हे जाणून घेऊ.
हाय कोलेस्टेरॉलमध्ये कॉफी प्यावी की नाही?
कॉफी पिण्याचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे. जगभरातील लोक वेगवेगळ्या प्रकारची कॉफी पितात. कॉफी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात, पण कोलेस्टेरॉल हाय असल्यावर कॉफी प्यावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो.
जास्त कॅफीन नुकसानकारक
कॉफीमध्ये असे अनेक गुण असतात जे फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करणं, स्ट्रेस कमी करण्यातही कॉफीची मदत मिळते. योग्य प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्यास हृदयरोग असलेल्यांना फायदा मिळतो. पण यातील कॅफीनचं प्रमाण जास्त झालं तर शरीराला अनेक गंभीर नुकसान होऊ शकतात.
जीवाला धोका
2023 मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कॉफी जास्त प्यायल्यानं काही लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू शकतं. अशात हृदयरोगाचा धोका वाढतो आणि जीवालाही धोका होऊ शकतो.
किती कप कॉफी नुकसानकारक?
webmd च्या एका रिपोर्टनुसार, रोज ४ कपांपेक्षा जास्त कॉफी प्यायल्यास हार्ट डिजीजनं मृत्यू होण्याचा धोका वाढतो. कॉफीमध्ये दोन नॅचरल ऑइल असतात, ज्यात कॅफेस्टोल आणि काह्वेओल हे दोन केमिकलस असतात, जे कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढवू शकतात.