Electrol Powder Side Effects: उन्हाळ्यात सतत जाणारा घाम, थकवा यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. अशात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला हेल्थ एक्सपर्ट देत असतात. बरेच लोक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीराला एनर्जी देण्यासाठी लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचे ज्यूसही पितात. आपण पाहिलं असेल की, बरेच लोक या दिवसांमध्ये इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी सुद्धा पितात. अर्थात इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी हे शरीराला हायड्रेट ठेवतं, पोषण देतं. पण याचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच याचे काही नुकसानही आहेत. जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहेत. जेणेकरून यापासून आरोग्याचं नुकसान होऊ नये.
इलेक्ट्रॉल पावडर काय आहे?
आपण पाहिलं असेलच की, इलेक्ट्रॉल पावडर ही एक पांढऱ्या रंगाची पावडर असते. जी वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये मिळते. ही पावडर पाण्यात मिक्स करून प्यायली जाते. यात मुख्यपणे सोडिअम, पोटॅशिअम, क्लोराइड, ग्लूकोज आणि सिट्रीक अॅसिडसारखे पोषक तत्व असतात. जे शरीरात पाणी आणि खनिजांचं संतुलन कायम ठेवतात.
इलेक्ट्रॉल पावडरचे नुकसान
- भरपूर फायदे मिळतात, याने काही नुकसान होणार नाही याचा विचार करून जर आपण जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉलचं पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा. कारण जर जास्त प्रमाणात हे पाणी प्याल तर शरीरात मीठ आणि शुगरचं प्रमाण वाढू शकतं.
- इलेक्ट्रॉलच्या पाण्यामध्ये ग्लूकोज म्हणजेच शुगर असते. जी डायबिटीसच्या रूग्णांसाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे हे पाणी विचार करूनच प्यावं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने प्यावं.
- इलेक्ट्रॉल पावडरच्या पाण्यात सोडिअम असतं, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी हे जास्त प्रमाणात पिऊ नये. हाय बीपीच्या रूग्णांना याने त्रास होऊ शकतो.
- जास्त प्रमाणात जर इलेक्ट्रॉलचं पाणी प्याल तर याने किडनीवर दबाव पडतो आणि शरीरात पाणी जमा होऊ लागतं. त्यामुळे किडनीची समस्या असणाऱ्या लोकांनी हे पाणी पिणं टाळावं किंवा कमी प्रमाणात प्यावं.
कुणी, कसं आणि कधी प्यावं?
डॉक्टर सांगतात की, इलेक्ट्रॉलचं पाणी हे कुणाला जुलाब असेल, उलटी होत असेल किंवा शरीरातील पाणी कमी झालं असेल तर प्यावं. तापात कमजोरी असेल तेव्हाही आपण हे पाणी पिऊ शकता. रोज विनाकारण हे प्याल तर तब्येत बिघडू शकते. कुणी किती प्यावं याबाबत काही नियमही आहेत.
- १८ वर्षावरील लोकांनी १ लीटर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडरचा एक पाउच घाला. हे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावं.
- २ वर्षांपेक्षा वयाच्या मुलांना द्यायचं असेल तर १ पाउच ५०० मिलीलीटर पाण्यात टाकावं. मुलांना दर ५ ते १० मिनिटांनंतर छोटे छोटे घोट द्यावे. सोबतच त्यांना साधं पाणी सुद्धा द्यावं.
- २ वर्षांपेक्षा लहान मुलांना इलेक्ट्रॉलचं पाणी हे डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच द्यावं. ते सांगितील त्या प्रमाणात द्यावं.
इलेक्ट्रॉल पावडर खूप फायदेशीर आहे. ज्याने शरीरात पाणी आणि आवश्यक मिनरल्सची कमतरता दूर होते. पण ते योग्य प्रमाणात आणि विचार करून घेतलं जावं. विनाकारण आणि जास्त प्रमाणात याचं पाणी प्याल तर फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतं.
