Join us  

काळजी वाढली! चहा, कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यास दृष्टी जाण्याचा धोका; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:33 PM

Caffeine side effects Research : ऑफिसमध्ये किंवा घरी असताना एकदा, दोनदा नाही अनेकदा चहाचं सेवन केलं जातं.  तुमचा विश्वास बसणार नाही पण चहाच्या सेवनाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

ठळक मुद्देकॅफेनचे अतिसेवन डोळ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते. यात चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक, कॅफेनयुक्त एनर्जी टॅबलेट यांचा समावेश आहे.

रोजच्या कामामुळे येणारा थकवा आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी बर्‍याचदा आपल्याला चहा आणि कॉफी पिण्याची गरज भासू लागते. ते पिल्यानंतर लवकरच शरीरात तरतरी आल्यासारखं वाटतं आणि आपण पुन्हा काम करायला सुरूवात करतो. ऑफिसमध्ये किंवा घरी असताना एकदा, दोनदा नाही अनेकदा चहाचं सेवन केलं जातं.  तुमचा विश्वास बसणार नाही पण चहाच्या सेवनाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रोज कॅफिनचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास दृष्टी जाण्याचा धोका असू शकतो. अलिकडेच वैज्ञानिकांनी या गंभीर समस्येबाबत लोकांना धोक्याचा इशार दिला आहे. 

कॅफेनचे अतिसेवन डोळ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते. यात चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक, कॅफेनयुक्त एनर्जी टॅबलेट यांचा समावेश आहे. अमेरिकेत अलिकडेच झालेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की वैज्ञानिकांना जास्त प्रमाणात कॅफेनचे सेवन करत असलेल्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त असलल्याचं दिसून आलं. आज आम्ही तुम्हाला कॅफेनचे सेवन डोळ्यांसाठी कसे हानीकारक ठरते याबाबत सांगणार आहोत. 

कॅफेनच्या अतिसेवनामुळे ग्लुकोमा या आजाराचा धोका वाढतो

माउथ सिनाईमधील आयकॉन स्कूल ऑफ मेडिसिनच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या संशोधनातून वैज्ञानिकांनी सांगितले की, ज्या लोकांना अनुवांशिकतेने डोळ्यांच्या आजाराचा धोका असतो असे लोक जास्त प्रमाणात कॅफेनचं सेवन करत असतील तर या  आजाराचा धोका वाढू शकतो. अमेरिकेत ग्लूकोमा  आंधळेपणाचं प्रमुख कारण मानलं जात आहे.  ग्लूकोमा एक अशी स्थिती आहे जी डोळ्याच्या ऑप्टिक मज्जातंतूना हानी पोहोचवते. ग्लूकोमा अनुवांशिक असू शकतो, ज्यामुळे डोळ्याच्या आत दबाव वाढतो. हा दबाव ऑप्टिक मज्जातंतूंना हानी पोहोचवू शकतो, ज्या मेंदूला प्रतिमा पाठवतात.

कॅफेनचं सेवन किती प्रमाणात  केल्यास नुकसाकारक ठरतं.

अभ्यासात शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की ज्या लोकांमध्ये अनुवांशिकरित्या ग्लूकोमा असण्याची शक्यता  जास्त असते. त्यांना धोका जास्त असतो. अशा स्थितीत कॅफेनचे सेवन कमी प्रमाणातच करायला हवे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कॅफेनचे ४८० मिलिग्रामपेक्षा जास्त सेवन करू नये.

डोळ्यांमध्ये  दबाब का वाढतो?

अनुवांशिकतेने जास्त धोका असलेल्यांच्या तुलनेत इतर लोकांमध्ये प्रतिदिन ३२१ मिलिग्रामपेक्षा अधिक कॅफिनचे सेवन केल्यानं ३.९ टक्क्यांपर्यंत ग्लूकोमाचा धोका वाढतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डोळ्यांमध्ये एका प्रकारचा द्रव पदार्थ निर्माण झाल्यानं दबाब वाढतो. सामान्यपणे हा द्रव हा पदार्थ ट्रॅब्युलर मेशवर्क नावाच्या पेशीच्या माध्यमातून डोळ्यात डोळ्यात प्रवेश करतो. 

अभ्यास काय सांगतो?

या अभ्यासाचे सह लेखक एंथना ख्वाजा यांच्या म्हणण्यानुसार ग्लूकोमाचे रुग्ण विचारतात की जीवनशैलीत बदल करून या आजाराला रोखता येऊ शकतं का? या प्रश्नाचं योग्य उत्तर अजूनही सापडलेलं नाही. या अभ्यासाच्या आधारावर तुम्ही सांगू शकता की ग्लूकोमामध्ये अनुवांशिक जोखिम जास्त असल्यानं कॅफिनचं सेवन कमी प्रमाणात करायला हवं. कॅफेनचे जास्त सेवन करत असलेल्यांमध्ये अंधपणाचा वाढता धोका या संशोधनातून दिसून आला. 

लक्षणं

ग्लूकोमाच्या लक्षणांबाबत  शार्प साईट आय हॉस्पिटलमधील वरिष्ठ नेत्र रोग  तज्ज्ञ डॉ. चिराग गुप्ता यांनी सांगितले की, ग्लूकोमाच्या सुरूवातीला कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. आजार जास्त वाढल्यानंतर काही प्रमाणात लक्षणं दिसू शकतात. गंभीर लक्षणांपासून बचाव करण्यासाठी कॅफेनचे कमी प्रमाणात सेवन करायला हवे. याशिवाय योग्य प्रकारे व्यायाम करा आणि डॉक्टरांशी बोलून तुम्ही आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्ससंशोधनडोळ्यांची काळजी