Join us

करा कोबीची कुरकुरीत भजी, चवीला उत्कृष्ट पचायला हलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2023 15:54 IST

Cabbage Pakoda (Indian Cabbage Fritters) कांदा भजी नेहमीची आता कोबीची भजी खाऊन तर पाहा.

कोबीची भाजी, कोबीचे पराठे, कोबीची वडी. कोबीची भजी, असे कोबीचे अनेक पदार्थ केले जातात. काहींना कोबी फार आवडते तर, काहींना नाही. कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी हे फायदेशीर आहे. कोबी पचण्यास जड नाही. कोबीच्या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

कोबीची कोशिंबीर देखील होतो. काही लोक कच्चा कोबी किंवा भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. आपण मग कोबीची भजी करु शकतो. कांद्याऐवजी कोबी. चवीला उत्कृष्ट व कुरकुरीत भजी होतात. चला तर मग या क्रिस्पी पदार्थाची कृती पाहूयात(Cabbage Pakoda (Indian Cabbage Fritters).

कोबीची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोबी

हिरवी मिरची

कोथिंबीर

मीठ

हळद

वांगी कोवळी-चविष्ट आहेत की निबर-बियांवाली हे ओळखण्याच्या २ टिप्स, खरेदी करतानाच लक्षात ठेवा

लाल तिखट

धणे पूड

जिरे पूड

गरम मसाला

लिंबाचा रस

बेसन

तांदळाचं पीठ

तेल

अशी करा कुरकुरीत कोबीची भजी

सर्वप्रथम, कोबी बारीक चिरुन घ्या. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, लिंबाचा रस घालून मिश्रण मिक्स करा.

त्यात एक कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ, २ टेबलस्पून तेल घालून मिश्रण मिक्स करा. गरज असल्यास पाणी घाला, कारण कोबीला पाणी सुटते. आता हे मिश्रण चांगले मिक्स करा.

काही केल्या चपात्या गोल होत नाहीत? नकाशे वेडेवाकडे? कडकही होतात? सोप्या ३ टिप्स..शिका चपात्या करायला

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर मिडीअम फ्लेमवर कोबीची भजी तळून घ्या. भजीला सोनेरी रंग आल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे कोबीची कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी. आपण ही भजी सॉस किंवा चटणीसह खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स