Lokmat Sakhi >Food > ब्रेड आणि दूध, करा मस्त गोड पदार्थ झटपट - अचानक आले पाहुणे तरी नो टेन्शन

ब्रेड आणि दूध, करा मस्त गोड पदार्थ झटपट - अचानक आले पाहुणे तरी नो टेन्शन

Bread and milk, make delicious sweets instantly : ब्रेडचा असा पदार्थ ही करता येतो याची कल्पनाच नसेल. पाहा मस्त मिठाई.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 11:31 IST2025-05-06T11:30:58+5:302025-05-06T11:31:58+5:30

Bread and milk, make delicious sweets instantly : ब्रेडचा असा पदार्थ ही करता येतो याची कल्पनाच नसेल. पाहा मस्त मिठाई.

Bread and milk, make delicious sweets instantly | ब्रेड आणि दूध, करा मस्त गोड पदार्थ झटपट - अचानक आले पाहुणे तरी नो टेन्शन

ब्रेड आणि दूध, करा मस्त गोड पदार्थ झटपट - अचानक आले पाहुणे तरी नो टेन्शन

गोडाचे पदार्थ करायला बरेच सामान लागते तसेच वेळही भरपूर लागतो. म्हणून मिठाई अनेक जण विकतच आणतात. मात्र काही असे पदार्थ असतात जे करायला अगदीच सोपे असतात. (Bread and milk, make delicious sweets instantly)तसेच काही तरी वेगळी पद्धत असते. पारंपारिक नसतात मात्र चवीला अगदी मस्त लागतात. असाच हा सोपा पदार्थ अगदी कमी सामग्री वापरुन करता येतो. तसेच करायलाही जास्त वेळ लागत नाही. पाहा जरा हटके रेसिपी.    

साहित्य
ब्रेड, दूध, साखर, तूप, कस्टर्ड पावडर, सुकामेवा, वेलची पूड

कृती
१. ब्रेडच्या कडा काढून घ्या. नंतर ब्रेडचे चौकोनी तुकडे करुन घ्या. एका पॅनमध्ये तूप घ्या. (Bread and milk, make delicious sweets instantly)तूप जरा जास्त घ्यायचे. तेल घेतले तरी चालते मात्र तुपाची चव जास्त छान लागेल. तेलाला ती चव येणार नाही.  तूप गरम झाल्यावर त्यात ब्रेडचे तुकडे घाला आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत परता. ब्रेडचे तुकडे तांबडे झाले की काढून घ्या.  ब्रेड लगेच कुरकुरीत होतो त्यामुळे तो करपणार नाही याची काळजी घ्या. 

२. एका पातेल्यात दूध गरम करत ठेवा. दूध तापल्यावर त्यात वेलची पूड घाला तसेच आवडीनुसार साखर घाला. साखर विरघळू द्या. साखरेऐवजी गुळही वापरु शकता. नंतर एका वाटीमध्ये उकळलेल्या दुधातले थोडे दूध काढून घ्या आणि त्यात कस्टर्ड पावडर घाला. घट्ट पेस्ट करुन घ्या. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. दूध जरा छान उकळल्यावर वाटीतील मिश्रण दुधात घाला. दूध व्यवस्थित ढवळून घ्या. दुधात पेस्ट घातल्यावर गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे सतत ढवळायचे. कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लावरही वापरू शकता. अगदी थोडीच घ्यायची कस्टर्ड पावडरही जास्त घालू नका.  

३. हळूहळू दूध जरा घट्ट होईल. मग गॅस बंद करा. त्यामध्ये परतलेले ब्रेडचे तुकडे घाला. सगळे तुकडे घालून ठेऊ नका. नाही तर ते मऊ पडतील. जेवढे खायला घेणार तेवढेच तुकडे घालायचे.

४. वरतून आवडता सुकामेवा घाला. मात्र छान कुटून घ्या. किंवा तुकडे करुन घ्या. 

 

Web Title: Bread and milk, make delicious sweets instantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.