Black Wheat benefits : भुरक्या रंगाच्या गव्हापासून बनलेल्या चपात्या तुम्ही रोजच खात असाल, पण तुम्ही कधी काळ्या गव्हापासून तयार चपाती खाल्ली नसेल. बरेच लोक आजकाल काळ्या गव्हाच्या चपातीच्या खातात. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण काळ्याच्या चपातीचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जे वाचल्यावर तुम्ही काळ्या गव्हाची चपाती खाणं सुरू कराल. काळ्या गव्हाच्या चपातीने रक्ताची कमतरता दूर करण्यासोबतच आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. अशात चला जाणून घेऊ काळ्या गव्हाच्या चपातीचे फायदे आणि काही नुकसान.
एनीमिया होईल दूर
काळ्या गव्हाच्या चपातीने शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशिअमसोबतच आयर्नही मिळतं. त्यामुळे या गव्हाच्या चपातीचं नियमितपणे सेवन केल्याने शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते. ज्यामुळे एमीनियाचा धोकाही टाळता येतो. सोबतच या गव्हाच्या चपातीने शरीरात ऑक्सीजनची लेव्हलही योग्य राहते.
हृदयरोगांचा धोका टळतो
काळ्या गव्हाच्या सेवनाने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. काळ्या गव्हामध्ये ट्राइग्लिसराइड तत्व असतं. तसेच यात मॅग्नेशिअम भरपूर असतं. ज्यामुळे शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. जर तुम्हाला हृदयरोंगाचा धोका कमी करायचा असेल तर काळ्या गव्हाच्या चपातीचं सेवन करू शकता.
बद्धकोष्ठता होईल दूर
काळ्या गव्हाचं नियमितपणे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं. ज्यामुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. या गव्हाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ, पोट लगेच साफ होतं.
डायबिटीस राहील कंट्रोल
डायबिटीसमध्ये वाढती ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास काळ्या गव्हाच्या चपातीने मदत मिळते. याने बऱ्याच प्रमाणात ब्लड शुगर लेव्हल घटते. सोबतच डायबिटीसमध्ये होणाऱ्या समस्या दूर करण्यासही मदत मिळते.
काळ्या गव्हाची चपाती खाण्याचे नुकसान
यातील जास्त फायबरमुळे पोटासंबंधी, गॅस आणि अपचन अशा समस्या होण्याचा धोका असतो. असं तेव्हा होतं जेव्हा याचं तुम्ही जास्त प्रमाणात सेवन करता. तसेच काळ्या गव्हाच्या चपातीने एलर्जी सुद्धा होऊ शकते. ज्यांना आधीच कशाप्रकारची एलर्जी आहे, त्यांनी याचं सेवन टाळावं.
काळ्या गव्हाच्या सेवनाने पचन सुधारतं, ब्लड शुगर कंट्रोल राहते आणि हृदयालाही फायदा मिळतो. मात्र, याचं अधिक प्रमाणात सेवन केलं तर काही समस्या होण्याचा धोका असतो. त्यामुळे याचं सेवन कमी प्रमाणातच किंवा कधी कधी केलं जाऊ शकतं.