Join us

हिरवी की काळी, कोणत्या रंगाची द्राक्षं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:29 IST

Which Grapes are more beneficial : अनेकांच्या मनात प्रश्न पडत असेल की, दोनपैकी कोणती द्राक्ष जास्त फायदेशीर असतात? तसे तर प्रत्येक फळांचे आपले वेगवेगळे फायदे असतात.

Which Grapes are more beneficial : आंबट-गोड, रसाळ द्राक्ष खाणं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. या फळाची चव तर भारी असतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही पाहिलं असेल की, सामान्यपणे मार्केटमध्ये हिरव्या आणि काळ्या रंगाची अशी दोन प्रकारची द्राक्ष मिळतात. अशात अनेकांच्या मनात प्रश्न पडत असेल की, दोनपैकी कोणती द्राक्ष जास्त फायदेशीर असतात? तसे तर प्रत्येक फळांचे आपले वेगवेगळे फायदे असतात. मात्र, द्राक्षांबाबतही तेच आहे. मात्र, काही एक्सपर्ट सांगतात की, काही बाबतीमध्ये काळी द्राक्ष वरचढ ठरतात. 

हिरव्या द्राक्षांचे फायदे

हिरव्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्याच्या मदतीनं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच यातून शरीराला अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही मिळतात. जे पेशींना डॅमेज होण्यापासून वाचवतात आणि वाढत्या वयाची लक्षणं कमी करतात. हिरव्या द्राक्षांची आणखी एक खासियत म्हणजे यात कॅलरी सुद्धा कमी असतात. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

डाएट एक्सपर्ट सांगतात की, हिरव्या द्राक्षांमधील फायबर पचन तंत्र मजबूत ठेवतं. अशात पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते. 

काळी द्राक्ष खाण्याचे फायदे

काळ्या द्राक्षांबाबत सांगायचं तर यात एंथोसायनिन नावाचं एक पॉवरफूल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे हृदयासाठी फायदेशीर मानलं जातं. तसेच यात रेसवेराट्रॉलही आढळतं. जे शरीरातील सूज कमी करतं आणि शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कंट्रोल करतं. एक्सपर्ट सांगतात की, काळ्या द्राक्षांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटमुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते.

दोनपैकी जास्त फायदेशीर काय?

डाएट एक्सपर्ट सांगतात की, दोन्ही प्रकारची द्राक्षं फायदेशीर असतात. त्यांचे आपापले वेगवेगळे फायदे असतात. हिरव्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर असतं. तेच काळी द्राक्षं हृदयासाठी जास्त फायदेशीर असतात आणि यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे कोणती द्राक्षं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतील हे आरोग्यासंबंधी गरजांवर अवलंबून असेल. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स