Black jaggery vs yellow jaggery: गूळ आपल्या आहाराचा महत्वाचा भाग आहे. साखरेच्या तुलनेत गूळ अधिक प्रभावी ठरतो, कारण याने लगेच एनर्जी मिळते, इन्सलिन संतुलित राहतं, पोटावरील चरबी कमी होते आणि इतरही समस्या दूर करण्यास मदत मिळते. गोड टेस्ट सोबतच याने शरीर गरम राहतं, रक्त वाढतं आणि पचन तंत्रही मजबूत राहतं. आपण पाहिलं असेल की, बाजारात वेगवेगळ्या प्रकारचा गूळ मिळतो. जे बघून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, काळा गूळ चांगला असतो की पिवळा गूळ? दोन्ही गूळ रंगाने दिसायला तर वेगळे आहेतच, सोबतच त्यांतील पोषक तत्व आणि शुद्धताही वेगळी असते. अशात जाणून घेऊया की, दोन्हींमध्ये काय फरत असतो.
काळा गूळ कसा तयार होतो?
काळा गूळ हा ऊसाच्या रसापासून बनवला जातो. यात कोणत्याही केमिकल प्रोसेसशिवाय ऊसाचा रस घट्ट करून तयार केला जातो. ऊसाचा रस तोपर्यंत उकडला जातो, जोपर्यंत त्याचा रंग भुरका किंवा जवळपास पूर्ण काळा होत नाही. काळ्या गुळामध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतात. हेच कारण आहे की, काळा गूळ रक्ताची कमतरता भरून काढण्यास फायदेशीर ठरतो.
पिवळा गूळ कसा बनवतात?
पिवळा गूळ बनवण्यादरम्यान रस साफ करण्यासाठी त्यात अनेकदा हायड्रोस म्हणजे सोडिअम हायड्रोसल्फाइट सारखे केमिकल्स वापरले जातात. जेणेकरून रंग हलका आणि टेक्स्चर चिकट रहावा.
पिवळा गूळ दिसायला साफ आणि स्वच्छ दिसतो, पण केमिकल प्रोसेसदरम्यान यातील अनेक मिनरल्स नष्ट होतात. काही केसेसमध्ये या केमिकल्सने अॅलर्जी किंवा पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.
कोणता गूळ खावा?
हेल्थ एक्सपर्टनुसार, काळा गूळ हा नॅचरल असतो आणि यात पोषक तत्व भरपूर असतात. याने शरीराची इम्यूनिटी वाढते, त्वचा उजळते, थकवा दूर होतो. असं असलं तरी एक्सपर्ट काळा गूळ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. कारण हा गूळ शुगरचं नॅचरल रूप आहे. डायबिटीसच्या रूग्णांनी हा गूळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
