छोले भटुरे हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. बऱ्याचदा वाढदिवस, किटी पार्टी, छोटेखानी गेटटुगेदर अशा लहानमोठ्या कार्यक्रमांना आवर्जून छोले भटुऱ्यांचा बेत केला जातो. कारण ते करायला आणि वाढायलाही सोपे जातात. पण बऱ्याचदा असं होतं की भटुरे छान फुगून येतच नाहीत. ते जर टम्म फुगले नाहीत तर मग भटुरे खाण्यात काय मजा (bhature recipe).. म्हणूनच अगदी फुटबॉलसारखे टरारून फुगणारे भटुरे घरच्याघरी करायचे असतील (cooking tips for fluffy bhature) तर पुढे सांगितलेली एक सोपी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा..(how to make bhature more fluffy?)
भटुरे टम्म फुगण्यासाठी काय करावं?
साहित्य
३ कप मैदा
४ टेबलस्पून रवा
दिड चमचा साखर आणि दिड चमचा मीठ
टाकून द्या घरातले कळकट गाऊन, पाहा स्टायलिश कफ्तान गाऊनचे ७ प्रकार-कम्फर्टसोबत मिळतो स्मार्ट लूक
२ टेबलस्पून दही
१ टीस्पून बेकिंग सोडा
कृती
सगळ्यात आधी तर एका पसरट भांड्यामध्ये मैदा आणि रवा एकत्र करून घ्या. हाताने हलवून दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
यानंतर त्यामध्ये मीठ, साखर, दही आणि बेकिंग सोडा घाला. यानंतर थोडं थोडं गरम पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ खूप सैलसर किंवा खूप घट्ट मळू नये. यानंतर त्या पिठावर एक ओलसर कपडा घाला आणि ते काही मिनिटे झाकून ठेवा.
१० ते १५ मिनिटांनंतर तेल लावून पुन्हा ८ ते १० मिनिटे पीठ मळून घ्या आणि त्याचे भटुरे लाटण्यासाठी लहान- लहान गोळे करा. हे गोळेही ५ ते ७ मिनिटे ओलसर कपड्याखाली झाकून ठेवा आणि त्यानंतर मैदा किंवा पीठ न लावता तेल लावून लाटून घ्या. यानंतर कडक तापलेल्या तेलात अलगदपणे सोडून ते तळून घ्या. भटूरा खालच्या भाजुने तळला जात असताना वरूनही त्यावर तेल घाला. बघा कसा मस्त फुलून येईल.
