Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पावसाळयात भजी म्हणजे जगात भारी सुख! करा मक्याच्या दाण्याची कुरकुरीत भजी, चमचमीत-खमंग

पावसाळयात भजी म्हणजे जगात भारी सुख! करा मक्याच्या दाण्याची कुरकुरीत भजी, चमचमीत-खमंग

Bhaji during the monsoon is the greatest happiness in the world! Make crispy sweet corn bhaji, sparkling and delicious : मक्याच्या दाण्याची भजी करायची सोपी पद्धत. ही रेसिपी एकदा नक्की करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 14:45 IST2025-06-06T14:44:10+5:302025-06-06T14:45:28+5:30

Bhaji during the monsoon is the greatest happiness in the world! Make crispy sweet corn bhaji, sparkling and delicious : मक्याच्या दाण्याची भजी करायची सोपी पद्धत. ही रेसिपी एकदा नक्की करा.

Bhaji during the monsoon is the greatest happiness in the world! Make crispy sweet corn bhaji, sparkling and delicious | पावसाळयात भजी म्हणजे जगात भारी सुख! करा मक्याच्या दाण्याची कुरकुरीत भजी, चमचमीत-खमंग

पावसाळयात भजी म्हणजे जगात भारी सुख! करा मक्याच्या दाण्याची कुरकुरीत भजी, चमचमीत-खमंग

पावसाळा आणि भजी यांचे एक अतूट नाते आहे. कांदा भजी तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वरचेवर घरी होतेच. बटाटा भजी केली जाते. मूग भजीही केली जाते. इतरही भजीचे अनेक प्रकार असतात. मक्याच्या दाण्याची भजी चवीला अगदी मस्त असते. या पद्धतीने एकदा करुन पाहा. नक्कीच आवडेल. 

साहित्य 
मक्याचे दाणे, मूगडाळ, चणाडाळ, हिरवी मिरची, जिरं, धणे, कांदा, ओवा, हिंग, हळद, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, बेसन, खाण्याचा सोडा 

कृती
१. चणाडाळ स्वच्छ धुवायची. धुतलेली डाळ किमान एका तासासाठी भिजत ठेवायची. तसेच मूगडाळ स्वच्छ धुवायची. मूगडाळही तासभरासाठी भिजत ठेवायची. वाटीभर मूगडाळ घेतली की अर्धी वाटी चणाडाळ घ्यायची.  

२. मक्याचे ताजे दाणे घ्यायचे. सोलून ठेवलेले मक्याचे दाणे मिळतात. ते नसतील तर मका घ्या आणि दाणे सोलून घ्या. पण ताजेच घ्यायचे. जून घेऊ नका. मक्याचे दाणे थोडावेळ पाण्यात भिजवायचे.  कोथिंबीर छान बारीक चिरायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे.

३. एका मिक्सरच्या भांड्यात मक्याचे दाणे घ्यायचे. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. भिजवलेली चणाडाल घालायची आणि भिजवलेली मूगडाळही घालायची. चमचाभर जिरे घालायचे आणि चमचाभर धणे घालायचे. पातळ वाटायचे नाही. मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटायचे. वाटून झाल्यावर एका खोलगट पातेल्यात काढून घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. ओवा हातावर घ्यायचा आणि जरा चुरायचा. मग मिश्रणात घालायचा. हिंग घाला. लाल तिखट घालायचे. छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 

४. खाण्याचा सोडा घालायचा थोडा सगळं छान एकजीव करायचे. चवी पुरते मीठ घालायचे. बेसन घाला आणि सगळं मस्त कालवा. मिश्रण अति पातळ करु नका किंवा जास्त घट्टही करु नका. मध्यम करा. एका कढईत तेल तापत ठेवायचे. तेल गरम झाल्यावर थोडे तेल मोहन म्हणून मिश्रणात घालायचे. ढवळायचे आणि तेल मिश्रणात एकजीव करुन घ्यायचे.  

५. चमच्याने भजी सोडायची. छान सोनेरी तळायची मस्त कुरकुरीत करायची. डाळ जाडसर ठेवल्यामुळे भजी जास्त चविष्ट लागते. हिरवी चटणी किंवा आवडती कोणतीही चटणी घ्यायची.                 

Web Title: Bhaji during the monsoon is the greatest happiness in the world! Make crispy sweet corn bhaji, sparkling and delicious