Join us

Shravan Food : खमंग उपवासाचं थालीपीठ खायचं तर फक्त एक तासात करा ‘अशी’ उपवास भाजणी, पारंपरिक प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2025 15:43 IST

How To Make Upvasachi Bhajani?: उपवासाच्या भाजणीचे पीठ विकत घेण्यापेक्षा या सोप्या पद्धतीने घरच्याघरीच करून पाहा..(upvas bhajani recipe in marathi)

ठळक मुद्देभाजणीचे पदार्थ मंद किंवा मध्यम आचेवर खमंग भाजले गेले पाहिजेत. जर ते पदार्थ पुरेसे भाजले गेले नाहीत तर तुमचं थालिपीठ थोडं कच्चं लागेल

श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार अशा कित्येक उपवासांना सुरुवात झाली. आता उपवास करायचे असतील तर त्यासाठी भाजणीचे थालिपीठ हा पदार्थ अतिशय उत्तम मानला जातो. कारण त्यामुळे उपवासाचा त्रास होत नाही. खरंतर उपवासाची भाजणी घरच्याघरी करणं अतिशय सोपं आहे. पण त्याची योग्य रेसिपी माहिती नसल्याने अनेक जणी भाजणीचे पीठ विकत आणतात. ते बरेच महागही असते (How To Make Upvasachi Bhajani?). म्हणूनच उपवासाची भाजणी विकत घेण्यापेक्षा पुढे सांगितलेल्या पद्धतीने एकदा घरच्याघरी करून पाहा. थालिपीठ खूप चवदार आणि जास्त पौष्टिक होईल.(upvas bhajani recipe in marathi)

उपवासाची भाजणी कशी करावी?

 

साहित्य

१ वाटी साबुदाणा

१ वाटी राजगिरा

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

दिड वाटी भगर

२ टेबलस्पून जिरे (ज्यांच्याकडे उपवासाला चालत असतील त्यांनी टाकावे, नाही घातले तरी चालते.)

कृती

उपवासाची भाजणी करताना सगळ्यात आधी साबुदाणा भाजून घ्यावा. साबुदाणा किंवा भाजणीचे कोणतेही पदार्थ भाजताना गॅसची फ्लेम नेहमी मध्यम असावी. साबुदाण्याला हलका सोनेरी रंग आल्यानंतर तो कढईतून काढून घ्या.

 

यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करून राजगिरा भाजून घ्यावा. राजगिरा भाजून कढईतून बाहेर काढून घेतल्यानंतर भगर भाजून घ्यावी. सगळ्यात शेवटी जिरे भाजून घ्यावे. हे सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे. किंवा गिरणीतून दळून आणावे. भाजणीचे पीठ झाले तयार.. 

लिंबू पिळून सालं फेकून देऊ नका, रोपांसाठी वापरा- रोपांवर रोग पडणार नाही, हिरवीगार होतील

उपवासाची भाजणी घरी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भाजणीचे पदार्थ मंद किंवा मध्यम आचेवर खमंग भाजले गेले पाहिजेत. जर ते पदार्थ पुरेसे भाजले गेले नाहीत तर तुमचं थालिपीठ थोडं कच्चं लागेल, त्याची चव खुलणार नाही. त्यामुळे पदार्थ भाजताना अजिबात घाई करू नका. सावकाशपणेच भाजा. 

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.