कांदा चिरणे... हे स्वयंपाक घरातील सगळ्यांत कंटाळवाणे आणि किचकट काम. कांदा सोलण्यापासून ते त्याचे बारीक-बारीक तुकडे करेपर्यंत लागणारा वेळ आणि डोळ्यातून येणारे पाणी यामुळे जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो. यातही जर कांदा एकदम बारीक चिरायचा असेल तर अजूनच किचकट काम वाटते. काही मोजके पदार्थ (best way to chop onions quickly) तयार करण्यासाठी कांदा एकदम बारीक चिरून घ्यावा लागतो. परंतु अशावेळी, डोळ्यात पाणी येणे, कांदा बारीक चिरून हात दुखणे आणि एवढ्याशा कामासाठीच भरपूर वेळ जाणे हे ओघाने आलेच(quick onion chopping method).
अशा परिस्थतीत, कोणताही त्रास न होता, डोळयांतून पाणी न येता कांदा झटपट बारीक चिरण्याची एक सोपी ट्रिक आपण नक्कीच आजमावून पाहू शकतो. तुमचा वेळ आणि श्रम वाचवणारी, तसेच डोळ्यांतील पाणी थांबवणारी एक सोपी आणि जबरदस्त 'ट्रिक' आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी कमी वेळात एकदम बारीक कांदा सहज चिरू शकाल. कांदा चिरण्याची ही एक नवी ट्रिक वापरल्यास अगदी कमी वेळात कांदा बारीक आणि एकसारखा चिरता येतो. ही खास आणि सिक्रेट युक्ती कोणती (onion cutting hack without tears) आहे, जी वापरून व्यावसायिक शेफ देखील काही मिनिटांत किलोभर कांदा सहज चिरतात ते पाहूयात... एकदम बारीक कांदा झटपट चिरुन स्वयंपाक करण्याचा वेळ कसा वाचवायचा याचा देसी जुगाड...
कांदा एकदम बारीक चिरण्याची सोपी ट्रिक....
पोषणतज्ज्ञ मेगानी लिओनेलो यांनी इन्स्टाग्रामवर, कांदा चिरण्याचा एक जुगाड शेअर केला आहे. ज्यामुळे अवघ्या ३० सेकंदात कांदा बारीक चिरून होईल आणि डोळ्यांतून पाण्याचा थेंबही येणार नाही. यासाठी, सगळ्यांत आधी कांद्याची सालं काढून तो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर, कांद्याची शेंडी आणि मुळाकडचा भाग कापून घ्या. मग कांदा सपाट पृष्ठभागावर ठेवून त्याचा शेंडी कडील भाग हाताने धरुन, सुरीच्या मदतीने कांद्याला उभे कट्स द्या. मग कांदा आडवा धरून फक्त सूरी फिरवा... बस्स! अवघ्या ३० सेकांदात बारीक चिरलेला कांदा झटपट तयार...
तेलाचा थेंबही न वापरता करा परफेक्ट कुरकुरीत डोसा ! उडप्याचे खास सिक्रेट - सुपर क्रिस्पी डोसा तयार...
या हॅकमुळे स्वयंपाकघरातील मोठा प्रश्न सुटतो. मोठ्या कुटुंबासाठी भाजी करताना किंवा पार्टीसाठी तयारी करताना तासभर कांदे चिरावे लागतात, तेव्हा डोळ्यांतून पाणी येते आणि नकोसे वाटते. पण, या जुगाडामुळे वेळ तर वाचेलच, आणि डोळ्यांना पाण्याच्या धारा देखील लागणार नाहीत.
सोशल मीडियावर अनेकांनी या कांदा चिरण्याच्या ट्रिकला गेम चेंजर म्हटले आहे, तर काहींनी 'हे तर आधी का नाही समजले?' असा प्रश्न केला आहे. तर काही जणांनी स्वतः ट्राय करून कमेंट्समध्ये लिहिले की, "खरंच, यामुळे कांदा चिरणं अगदी सोपं झालं."