Best Winter Soup: थंडीच्या दिवसांमध्ये शरीर गरम, एनर्जेटिक आणि निरोगी ठेवणं खूप गरजेचं असतं. अशावेळी गरमागरम सूप हा एक असा पर्याय आहे, जो चव, पोषण आणि उबदारपणा तिन्ही देतो. अशात कोणते सूप आपल्याला थंडीपासून वाचवू शकतात आणि निरोगी ठेवू शकतात हेच आपण पाहणार आहोत. या लेखात टोमॅटो, व्हेजिटेबल आणि लसूण अशा तीन सोप्या आणि हेल्दी सूप रेसिपीज दिल्या आहेत, ज्या तुम्ही घरच्या घरी त्वरीत बनवू शकता.
हिवाळ्यात बनवा हे हेल्दी सूप
1) व्हेजिटेबल सूप
साहित्य :
गाजर
बीन्स
मटार
टोमॅटो
कांदा
आले
लसूण
मीठ, मिरी
लोणी / बटर
कृती
सगळ्या भाज्या छोट्या तुकड्यांत चिरा. एका पॅनमध्ये लोणी गरम करून त्यात कांदा, आले, लसूण परतून घ्या. नंतर चिरलेल्या भाज्या आणि थोडसं पाणी घालून 10 मिनिटं शिजवा. मीठ आणि मिरी घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.
2) टोमॅटो सूप
साहित्य :
टोमॅटो
लोणी
मीठ
काळी मिरी
चिमूटभर साखर
थोडा कॉर्न फ्लोअर
कृती
टोमॅटो उकळून मिक्सरमध्ये प्युरी करा. पॅनमध्ये लोणी गरम करून प्युरी घालून उकळा. कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून घालून सूप घट्ट करा. मीठ, मिरी आणि साखर घालून 5 मिनिटं उकळा. उबदार आणि चविष्ट टोमॅटो सूप तयार!
3) लसणाचा सूप
साहित्य :
लसणाच्या पाकळ्या
कांदा
लोणी
पाणी
मीठ, काळी मिरी
कृती
कांदा आणि लसूण लोण्यात हलके सोनेरी होईपर्यंत परता. पाणी घालून सुमारे 10 मिनिटे मंद आचेवर उकळा. मीठ आणि मिरी घालून सर्व्ह करा. हे सूप सर्दी-पडस्यात विशेष फायदेशीर आहे.
सूपचे पिण्याचे फायदे
सूपमध्ये असलेले व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स इम्युनिटी वाढवतात. शरीराला आतून उबदारपणा मिळतो. थंडीत होणारी सुस्ती कमी होते आणि एनर्जी टिकून राहते. पचायला हलके असल्याने पचन सुधारते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही सूप उत्तम पर्याय.
