Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात पोट कमी करायचं असेल तर ट्राय करा 'हे' सूप, मिळेल भरपूर प्रोटीन आणि रहाल फिट

हिवाळ्यात पोट कमी करायचं असेल तर ट्राय करा 'हे' सूप, मिळेल भरपूर प्रोटीन आणि रहाल फिट

High Protein Soups for Winter : काही सूप असे असतात ज्यांमध्ये प्रोटीनसोबतच फायबरही भरपूर असतं. जे वजन कमी करण्यास मदत करतात. आपल्याला सुद्धा हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर काही टेस्टी आणि हेल्दी सूपचं सेवन करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:44 IST2025-12-01T11:42:05+5:302025-12-01T11:44:52+5:30

High Protein Soups for Winter : काही सूप असे असतात ज्यांमध्ये प्रोटीनसोबतच फायबरही भरपूर असतं. जे वजन कमी करण्यास मदत करतात. आपल्याला सुद्धा हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर काही टेस्टी आणि हेल्दी सूपचं सेवन करू शकता.

Best high protein soup for weight loss in winter | हिवाळ्यात पोट कमी करायचं असेल तर ट्राय करा 'हे' सूप, मिळेल भरपूर प्रोटीन आणि रहाल फिट

हिवाळ्यात पोट कमी करायचं असेल तर ट्राय करा 'हे' सूप, मिळेल भरपूर प्रोटीन आणि रहाल फिट

High Protein Soups for Winter : हिवाळा आला की थंडीपासून बचावासाठी भरपूर लोक आवडीनं वेगवेगळ्या प्रकारचे सूप पितात. सोबतच बरेच लोक शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी देखील वेगवेगळे सूप पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वाढलेला लठ्ठपणा आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हाय प्रोटीन असलेला आहार खूप फायदेशीर मानला जातो. कारण प्रोटीनमध्ये कॅलरी कमी असतात आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा भूकही लागत नाही. काही सूप असे असतात ज्यांमध्ये प्रोटीनसोबतच फायबरही भरपूर असतं. जे वजन कमी करण्यास मदत करतात. आपल्याला सुद्धा हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर काही टेस्टी आणि हेल्दी सूपचं सेवन करू शकता. सूपच्या अशाच काही खास रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रोटीन सूप पिण्याचे फायदे

प्रोटीनयुक्त सूपमुळे आराम तर मिळतोच सोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते. प्रोटीन भूकेच्या हार्मोनना कंट्रोल करतं. ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. त्याशिवाय काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, हाय प्रोटीनच्या सेवनाने मसल्स मास रिटेंशन आणि मेटाबॉलिज्मला खूप सपोर्ट मिळतो. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

१) मूग डाळीचे सूप

इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्यूलर सायन्सेजमध्ये एका रिसर्चनुसार, सगळ्यात चांगल्या हाय प्रोटीन सूपमध्ये डाळीच्या सूपचा समावेश केला जातो. ज्यात प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. 

सूपसाठीचं साहित्य

१ कप मूगाची डाळ, १ कापलेलं गाजर , १ कापलेला कांदा, लसणाच्या एक-दोन कळ्या, ४ कप भाज्यांचं उकडलेलं पाणी, १ चमचा जिरे, मीठ आणि काळी मिरी पूड टेस्टनुसार.

कसं कराल तयार?

एका भांड्यात कांदा आणि लसूण नरम होईपर्यंत भाजा. नंतर त्यात गाजर, जिरे आणि डाळ टाका. या सगळ्यात गोष्टी २ मिनिटे परतवा. आता त्यात पाणी आणि भाज्यांचं पाणी टाकून उकडू द्या. डाळ साधारण ३० ते ४० मिनिटे शिजवा. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पूड टाका.

२) चणे आणि मशरूम सूप

अमेरिकन अॅग्रीकल्चर डिपार्टमेंटनुसार, १०० ग्रॅम चण्यांमध्ये २१ ग्रॅम प्रोटीन आणि १२ ग्रॅम फायबर असतं. या पोषक तत्वांमुळे भूक कंट्रोल राहते आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. दुसरीकडे मशरूममध्ये कॅलरी कमी असतात आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. 

सूपसाठी साहित्य

१ वाटी सुकलेले आणि धुतलेले चणे, १ कप कापलेले मशरूम, १ कापलेला कांदा, लसणाच्या २ कळ्या, ४ कप उकडलेल्या भाज्यांचं पाणी, १ चमचा ओवा, मीठ आणि काळी मिरी टेस्टनुसार.

कसं तयार कराल?

एका भांड्यात कांदा आणि लसूण सुगंध येईपर्यंत भाजा. नंतर त्यात मशरूम टाका आणि नरम होऊ द्या. नंतर त्यात छोले, ओवा आणि भाज्यांचं पाणी टाका. मीठ, काळी मिरी पावडर टाकून या सगळ्या गोष्टी उकडून घ्या. तुमचं सूप तयार आहे.

३) मटार सूप

अमेरिकन अ‍ॅग्रीकल्चर डिपार्टमेंटनुसार, मटारच्या दाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असतं. ज्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. तसेच ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते. मटारमध्ये फॅटही कमी असतं. इतकंच नाही तर यात फोलेट आणि आयर्नसारखे पोषक तत्वही असतात. 

साहित्य

१ कप मटार, १ कापलेलं गाजर, थोडा ओवा, १ कापलेला कांदा, ४ कप भाज्यांचं उकडलेलं पाणी, १ चमचा थाइम, मीठ आणि काळी मिरी.

कसं तयार कराल?

एका भांड्यात कांदा, गाजर आणि ओवा भाजून घ्या. त्यात मटार, भाज्यांचं पाणी टाकून कमी आसेवर ३० ते ४० मिनिटे उकडा. यात मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून सर्व्ह करा.

Web Title : सर्दियों में वजन घटाने के लिए उच्च प्रोटीन सूप: फिट बॉडी के लिए रेसिपी

Web Summary : इस सर्दी में वजन कम करना चाहते हैं? उच्च प्रोटीन सूप आपके लिए हैं! मूंग दाल, चने और मशरूम, और मटर से बनी रेसिपी दी गई हैं। यह सूप पेट भरने वाले, भूख को नियंत्रित करने वाले और चयापचय को बढ़ावा देने वाले हैं, जो वजन प्रबंधन में प्रभावी रूप से मदद करते हैं।

Web Title : High-protein soups for winter weight loss: Recipes for a fit body.

Web Summary : Want to lose weight this winter? High-protein soups are your answer! Recipes using moong dal, chickpeas with mushrooms, and peas are provided. These soups are filling, control hunger, and support metabolism, aiding weight management effectively.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.