Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळी मिरीच नाही तर पांढऱ्या मिरीही आरोग्यासाठी ठरते वरदान, पाहा काय काय मिळतात फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:48 IST

White Pepper Benefits : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, गरम असलेली ही मिरी योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे आहारात समाविष्ट केली, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यात मदत होऊ शकते.

White Pepper Benefits : सामान्यपणे काळी मिरी पूड रोज किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. पण आपण कधी पांढरी मिरी वापरलीये का? जर कधी वापरली नसेल तर त्याबाबत आज आपण पाहणार आहोत. पांढऱ्या मिरीला दखनी मिरी असेही म्हणतात, यात भरपूर पोषक तत्व आढळतात. हे पोषक तत्व तुमच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, गरम असलेली ही मिरी योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे आहारात समाविष्ट केली, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यात मदत होऊ शकते. चला तर, पाहूया दखनी मिरीचे काही जबरदस्त फायदे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पांढऱ्या मिरीमध्ये व्हिटामिन A आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही मिरी डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानली जाते. डोळ्यांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी दखनी मिरीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, वजन कमी करण्याच्या प्रवासाला गती द्यायची असल्यासही सफेद मिरी योग्य पद्धतीने सेवन केली जाऊ शकते.

सर्दी–खोकल्यात आराम

पांढरी मिरी गरम असल्यामुळे ती सर्दी, खोकला आणि कफ यांसारख्या तक्रारींमध्ये आराम देऊ शकते. तसेच, सांधेदुखी व सूज कमी करण्यासाठीही वाइट पेपरचा वापर करण्याची शिफारस केली जाते.

गट हेल्थसाठी उपयुक्त

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मतानुसार, पांढऱ्या मिरीमधील पोषक तत्व गट हेल्थ सुधारण्यास मदत करतात. गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारींमध्येही पांढरी मिरी उपयोगी ठरते. याशिवाय, व्हिटामिन C ने समृद्ध असल्यामुळे ही मिरी इम्युनिटी वाढवण्यास देखील मदत करते.

English
हिंदी सारांश
Web Title : White Pepper: A Boon for Health, Benefits Revealed!

Web Summary : White pepper, rich in nutrients, aids eye health, digestion, and immunity. It offers relief from coughs and joint pain. Incorporate it into your diet for overall well-being.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स