Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या दिवसात रोज रात्री झोपण्याआधी खा एक चमचा मध, दूर होतील कितीतरी समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:55 IST

Honey Benefits in winter : हिवाळ्यात जर रोज एक चमचा मध खाल्लं तर काय काय फायदे मिळतात?

Honey Benefits in winter : हिवाळ्याच्या दिवसांत जुने लोक नेहमीच मध खाण्याचा सल्ला देतात. कारण मधात व्हिटामिन C, व्हिटामिन B, व्हिटामिन E, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, मॅंगनीज, कॉपर आणि सेलेनियम असे अनेक महत्वाचे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणूनच औषधी गुणांनी भरपूर मध थंडीत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

घशासाठी फायदेशीर

जर तुम्ही दररोज रात्री झोपण्याच्या 1-2 तास आधी मध खाल्लं, तर घशाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. घशात खवखव, खोकला, सूज या सारख्या त्रासांवरही मध उपयोगी ठरतं. आरोग्य तज्ञांच्या मते, कोमट पाण्यासोबत मध घेतल्यास परिणाम अधिक चांगले मिळतात.

झोपेची गुणवत्ता सुधारते

मध मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध घेतल्यास दिवसभराचा ताण कमी होतो, मन शांत होतं,  गाढ आणि चांगली झोप येते. म्हणूनच झोपेची क्लालिटी सुधारण्यासाठी व इम्युनिटी वाढवण्यासाठी मध अत्यंत उपयुक्त आहे.

पोटासाठीही उत्तम

मधातील पोषक घटक पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर आपल्याला पोट बिघडणे, अपचन, गॅस किंवा आम्लपित्त टाळायचे असेल, तर मधाचा रोजच्या आहारात जरूर समावेश करा. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने मध घेतल्यास, फक्त काही आठवड्यांतच शरीरावर सकारात्मक बदल जाणवू लागतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Honey before bed: Solve many health problems in winter.

Web Summary : Honey offers vitamins and minerals, boosting immunity and aiding sleep. It soothes sore throats, reduces stress, and improves digestion. Add honey to your diet for overall winter wellness.
टॅग्स :अन्नथंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स