Ridge Gourd Health Benefits : बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टेस्टी तर असतातच, सोबतच त्यांमध्ये अनेक औषधी गुणही असतात. आता दोडक्याचंच घ्या ना. ही भाजी आयुर्वेदानुसार एक सुपरफूड आहे. त्यामुळे या भाजीचा रोज आहारात समावेश केला पाहिजे, असा सल्ला दिला जातो. बरेच लोक दोडकी आवडीनं खातात. पण त्यांना सुद्धा या भाजीतील पोषक तत्वांची माहिती नसते.
दोडक्यांमध्ये ९५ टक्के पाणी, फायबर, व्हिटामिन सी, आयर्न आणि मॅग्नेशिअम भरपूर असतं. या भाजीनं वजन कमी करण्यास मदत मिळते, सोबतच ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते. त्याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते. अशात दोडक्याची भाजी खाण्याचे काय काय फायदे मिळतात हे पाहुयात.
चरबी होईल कमी
दोडक्यांमध्ये कॅलरी खूप कमी असतात आणि फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. यातील पाण्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते. एक्सपर्ट सांगतात की, रोज एका दोडक्याची भाजी खाल्ल्यानं महिन्याभरात २ ते ३ किलो वजन कमी होतं.
डायबिटीस कंट्रोल
दोडक्यांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्याचे तत्व आढळतात. एक्सपर्टनुसार, दोडक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि यामुळे ब्लडमध्ये शुगरचं अॅब्जॉर्बशन स्लो होतं. डायबिटीसचे रूग्ण ही भाजी उकडून खाऊ शकतात किंवा याचा ज्यूसही पिऊ शकतात.
पचन तंत्र सुधारतं
दोडक्यांमधील डायटरी फायबर आतड्यांची आतून सफाई करतं. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्या दूर होतात. आयुर्वेद एक्सपर्टनुसार, दोडक्याचा ज्यूस प्यायल्यानं पोटाचा अल्सरही बरा होतो. ही भाजी सालीसोबत खाल्ली तर अधिक फायदा मिळतो.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
दोडक्यामध्ये व्हिटामिन सी आणि अॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर असतात, जे त्वचेवरील सुरकुत्या आणि डार्क स्पॉट कमी होतात. याची पेस्ट त्वचेवर लावली तर अॅक्ने आणि सनबर्नपासून आराम मिळतो. तेच याच्या ज्यूसनं केस धुतल्यास कोंडा आणि गेसगळतीची समस्या दूर होते.
लिव्हर-किडनी डिटॉक्स
दोडक्याची भाजी एका नॅचरल डिटॉक्सीफायरसारखं काम करते, ज्यामुळे लिव्हर आणि किडनीमधील विषारी तत्व बाहेर निघतात. दोडक्याच्या ज्यूस प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो आणि यूरिन इन्फेक्शनपासून बचाव होतो.
हाडं होतील मजबूत
दोडक्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. ४० वय ओलांडलेल्या महिला, पुरूषांनी ही भाजी नियमित खायला हवी. तुरईच्या बियांचं तेल जॉइंट्सच्या वेदना दूर करतं.