Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कोथिंबिरीच्या काड्या-बटाट्याची साल फेकणं म्हणजे मोठी चूक, पाहा ‘काय’ उपयोग करायचा..

कोथिंबिरीच्या काड्या-बटाट्याची साल फेकणं म्हणजे मोठी चूक, पाहा ‘काय’ उपयोग करायचा..

Kitchen Hacks: बऱ्याच भाज्या किंवा फळं असतात ज्यांचे अनेक फायदे असतात आणि यातून भरपूर पोषक तत्व मिळतात. यातच बटाटे येतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:01 IST2025-06-27T14:48:01+5:302025-06-27T19:01:11+5:30

Kitchen Hacks: बऱ्याच भाज्या किंवा फळं असतात ज्यांचे अनेक फायदे असतात आणि यातून भरपूर पोषक तत्व मिळतात. यातच बटाटे येतात.

Benefits of eating potato peels, Coriander Stem according to nutritionist | कोथिंबिरीच्या काड्या-बटाट्याची साल फेकणं म्हणजे मोठी चूक, पाहा ‘काय’ उपयोग करायचा..

कोथिंबिरीच्या काड्या-बटाट्याची साल फेकणं म्हणजे मोठी चूक, पाहा ‘काय’ उपयोग करायचा..

Kitchen Hacks:  सामान्यपणे जास्तीत जास्त महिला बटाटे किंवा कांदे कापले की त्यांच्या साली फेकतात. तर काही लोक या साली झाडांना खत म्हणून टाकतात, नाही तर गायी-म्हशीला खायला घालतात. असं काही केलं नाही तर कचऱ्यात फेकतात. एक्सपर्ट सांगतात की, ही एक मोठी चूक आहे. अशा बऱ्याच भाज्या किंवा फळं असतात ज्यांचे अनेक फायदे असतात आणि यातून भरपूर पोषक तत्व मिळतात. यातच बटाटे येतात. न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी बटाट्याची साल खाण्याचे फायदे सांगितले आहेत.

बटाट्याची साल खाण्याचे फायदे

न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन सांगतात की, बटाट्यांपेक्षा त्याच्या सालीमध्ये अधिक फायबर, आयर्न आणि पोटॅशिअम असतं. बटाट्याच्या सालीमध्ये तीन पट जास्त आयर्न असतं. सोबतच २० टक्के अधिक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. बटाट्याच्या सालीमध्ये क्लोरोजेनिक अ‍ॅसिड असतं, जे एक पावरफुल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे. अशात बटाट्याची साल फेकण्याऐवजी आहारात समावेश करा. म्हणजे बटाटे सालीसोबतच खावेत. 

शेंगदाणेही सालीसोबतच खा

शेंगदाणे सुद्धा बरेच लोक भाजल्यावर त्याची साल काढून खातात. मात्र, हे अनेकांना माहीत नसतं की, शेंगदाण्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे फ्री रॅडिकल्सना न्यूट्रिलाइज करतात. ज्यामुळे एजिंग प्रोसेस स्लो होते. तसेच शेंगदाणे सालीसोबत खाल्ल्यानं हृदय आणि त्वचाही चांगली राहते.

कोथिंबिरीच्या काड्या

अनेकदा कोथिंबीर निवडून झाली की, त्याच्या काड्या फेकल्या जातात. फक्त पानांचा वापर केला जातो. पण न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, कोथिंबिरीच्या काड्यांमध्ये ख्लोरॉफिल भरपूर असतं, फायबर असतं, पॉलीफेनॉल्स असतात आणि एसेंशिअल ऑइल्सही असतात. या काड्या जर खाल्ल्या तर पचनक्रिया चांगली होते आणि शरीरात इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय या काड्यांमध्ये अरोमा असतो, ज्यामुळे खाण्याची टेस्ट वाढते. त्यामुळे या काड्या फेकू नये.

Web Title: Benefits of eating potato peels, Coriander Stem according to nutritionist