Join us

फेकण्याआधी पाहा किती फायदेशीर असतात पपईच्या बिया, शरीराच्या कितीतरी समस्या होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:02 IST

Papaya Seeds Benefits : पपईची बी लिव्हरला टॉक्सिनपासून मुक्त करते आणि त्याची कार्यक्षमता वाढवते. ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि सिरॉसिससारख्या समस्यांपासून बचाव होतो.

Papaya Seeds Benefits : पिकलेली मुलायम आणि रसदार पपई खाणं सगळ्यांनाच आवडतं. पपईची गोड टेस्ट तर चांगली असतेच, सोबतच या फळाचे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे मिळतात. पण सामान्यपणे जास्तीत जास्त लोक पपई कापून आणि खाऊन झाल्यावर त्यातील काळ्या बिया फेकतात. मात्र, या बिया सुपरफूड असतात हे अनेकांना माहीत नसतं. कारण या बियांमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, एंझाइम्स, व्हिटामिन्स आणि खनिजे असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून बचाव करतात. आज आपण तेच म्हणजेच या बियांचे फायदे पाहणार आहोत.

पपईच्या बियांचे फायदे

लिव्हर डिटॉक्स

पपईची बी लिव्हरला टॉक्सिनपासून मुक्त करते आणि त्याची कार्यक्षमता वाढवते. ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि सिरॉसिससारख्या समस्यांपासून बचाव होतो.

किडनी निरोगी राहते

बियांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लामेटरी तत्व किडनीला इन्फेक्शन आणि सूजेपासून वाचवतात. नियमितपण जर पपईच्या बिया खाल्ल्या तर किडनी हेल्दी राहते.

पचन तंत्र सुधारतं

बियांमध्ये आढळणारं पपेन तत्व पचनक्रिया सुधारतं आणि बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्याही दूर करण्यास मदत मिळते.

डिटॉक्सिफिकेशन

पपईची बी शरीरातील घातक टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशात अनेक व्हायरल आजारांपासून बचाव होतो.

आतड्याचं आरोग्य सुधारतं

पपईच्या बिया आतड्यांमधील बॅड बॅक्टेरिया नष्ट करतात. खासकरून लहान मुलांच्या पोटातील बॅक्टेरिया यामुळे नष्ट होतात.

सूज व वेदनांपासून आराम

पपईच्या बियांमधील नॅचरल अँटी-इंफ्लामेटरी तत्वांमुळे सांधेदुखी आणि सूज यामध्ये आराम मिळतो.

वजन कमी करण्यात मदत

पपईच्या बियांमध्ये असलेलं भरपूर फायबर मेटाबॉलिझम वाढवतं. त्यामुळे फॅट लवकर बर्न होतं आणि वजन नियंत्रणात राहतं.

काय काळजी घ्याल?

पपईच्या बियांचे अनेक फायदे असले तरी या खाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर जास्त प्रमाणात बिया खाल्ल्या तर शरीराचं नुकसानही होऊ शकतं. 

कशा खाल बिया?

- पपईच्या बिया तुम्ही थेट अशाही खाऊ शकता. या बियांची टेस्ट थोडी चटपटीत लागते. आधी थोड्याच बिया खा नंतर प्रमाण वाढवा.

- पपईच्या बिया तुम्ही स्मूदीमध्ये टाकूनही खाऊ शकता. यानं शरीराला अधिक पोषण मिळेल.

- सलाद आणखी टेस्टी आणि वेगळा बनवण्यासाठी तुम्ही यात पपईच्या बिया टाकू शकता. यासाठी पपईच्या बिया बारीक करून सलादमध्ये टाका.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't discard papaya seeds! They offer surprising health benefits.

Web Summary : Papaya seeds, often discarded, are a superfood packed with fiber, antioxidants, and vitamins. They detoxify the liver and kidneys, improve digestion, boost immunity, kill intestinal bacteria, reduce inflammation and aid weight loss. Consume them directly, in smoothies, or salads, but in moderation.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स