गरमागरम जिलेबी हा अनेक लाेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ... साजूक तुपात तळलेल्या, बारीक तारेच्या, क्रिस्पी कुरकुरीत डॉलर जिलेबी म्हणजे आहाहा.. त्याची गोडी आणि चव आठवली तरी तोंडाला पाणी सुटतं.. पण आपल्या या सगळ्या भावना आणि जिलेबीप्रती असणारं प्रेम वेळीच कंट्रोल करावं लागतं (jalebi lover). कारण गोड, तुपकट, तेलकट, तळलेले पदार्थ आरोग्यासाठी किती त्रासदायक ठरू शकतात हे आपल्याला माहितीच आहे.. त्यामुळे जिलेबी नेहमीच मोजूनमापून खावी लागते. थोडी जास्त खाल्ली तर लगेच किती जास्तीच्या कॅलरी पोटात गेल्या असतील किंवा किती ग्रॅमने वजन वाढलं असेल याचं मनातल्या मनात गणित सुरू होतं. पण जिलेबी खाणं एवढं काही त्रासदायक नसून ती खाल्ल्यामुळे उलट आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात, असं म्हटलं जातंय.. बघा हे कितपत खरं आहे आणि कोणासाठी जिलेबी खाणं चांगलं आहे...(Is Eating Jalebi Good for Your Health?)
जिलेबी खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं का?
जिलेबी खाणं कोणासाठी चांगलं आहे, जिलेबी खाल्ल्यामुळे कोणकोणते शारिरीक त्रास कमी होऊ शकतात, याविषयी आहारतज्ज्ञ डॉ. सपना सिंह यांनी दिलेली माहिती न्यूज १८ ने प्रकाशित केली आहे.
खमंग-खुसखुशीत आणि किंचित गोडसर दुधातली दशमी, घ्या रेसिपी- प्रवासातला पारंपरिक पौष्टिक नाश्ता
यामध्ये आहारतज्ज्ञ सांगतात की ज्या लोकांना नेहमीच डोकेदुखी, मायग्रेन असा त्रास असतो त्या लोकांना जिलेबी खाणं फायद्याचं ठरतं. जिलेबी खाल्ल्यानंतर त्यांचा हा त्रास लगेच कमी होऊ शकतो. कारण जिलेबी खाल्ल्यामुळे सेरेटोनिन हा हार्मोन वाढतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होऊन मन, शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते. एकाग्रता वाढते.
आहारतज्ज्ञ असंही सांगतात की गरम दूध आणि जिलेबी हे दोन्ही पदार्थ जर एकत्र घेतले तर पचनासंबंधीचे त्रासही कमी होतात. पोट साफ होते. ॲलर्जीमुळे अनेकांना शरीरावर खाज येते. हा त्रास कमी करण्यासाठीही जिलेबी खाणं फायद्याचं ठरतं.
भात खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटते? बघा भाताचा आणि कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध
पण मधुमेह, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी मात्र त्यांच्या डाॅक्टरच्या सल्ल्यानुसारच जिलेबी खायची की नाही ते ठरवावं. एकंदरीतच काय की डॉ. सपना सिंह यांनी जरी ही माहिती दिली असेल तरी आपापल्या प्रकृतीनुसार, वजनानुसार, आजारांनुसार ज्याने त्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच जिलेबी खावी किंवा टाळावी. मनाने कोणतेही प्रयोग करणं नकोच..