Lokmat Sakhi >Food > लाल सफरचंदापेक्षाही चांगलं हिरवं सफरचंद, पाहा हिरव्या सफरचंदाचे ५ फायदे

लाल सफरचंदापेक्षाही चांगलं हिरवं सफरचंद, पाहा हिरव्या सफरचंदाचे ५ फायदे

Green Apple Benefits: अनेकांना हे माहीत नसतं की, हिरवं सफरचंद सुद्धा भरपूर पोषक असतं. यात लाल सफरचंदापेक्षाही जास्त गुण असतात, जे जास्त फायदेशीर ठरू शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:43 IST2025-06-12T14:56:35+5:302025-06-13T17:43:04+5:30

Green Apple Benefits: अनेकांना हे माहीत नसतं की, हिरवं सफरचंद सुद्धा भरपूर पोषक असतं. यात लाल सफरचंदापेक्षाही जास्त गुण असतात, जे जास्त फायदेशीर ठरू शकतात. 

Benefits of eating green apple daily you should know | लाल सफरचंदापेक्षाही चांगलं हिरवं सफरचंद, पाहा हिरव्या सफरचंदाचे ५ फायदे

लाल सफरचंदापेक्षाही चांगलं हिरवं सफरचंद, पाहा हिरव्या सफरचंदाचे ५ फायदे

Green Apple Benefits: सफरचंद खाणं सगळ्यांनाच आवडतं. चवीला टेस्टी आणि गोड असं हे फळ महाग असलं तरी लोक आवडीनं खातात. हे खायला तर चांगलं लागतंच, सोबतच आरोग्यालाही भरपूर फायदे मिळतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, सफरचंद खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक लाल सफरचंद खाण्याला प्राधान्य देतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, हिरवं सफरचंद सुद्धा भरपूर पोषक असतं. यात लाल सफरचंदापेक्षाही जास्त गुण असतात, जे जास्त फायदेशीर ठरू शकतात. 

हिरव्या सफरचंदाची चव हलकी आंबट-गोड असते, ज्यामुळे टेस्टही बदलते. तसेच शरीराला अनेक फायदेही मिळतात. जर लालऐवजी तुम्ही हिरवं सफरचंद नियमितपणे खाल तर शरीराला काय काय फायदे मिळतील हे जाणून घेऊया.

१) वजन कमी होतं

हिरव्या सफरचंदामध्ये भरपूर फायबर असतं आणि यात कॅलरी कमी असतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. रोज जर एक सफरचंद खाल्लं तर मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.

२) ब्लड शुगर कंट्रोल

हिरव्या सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. डायबिटीसच्या रूग्णांसाठी हे एक बेस्ट फळ मानलं जातं. कारण यानं हळूहळू शरीरात ग्लूकोज रिलीज होतं.

३) ग्लोईंग आणि चमकदार त्वचा

हिरव्या सफरचंदामधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामिन सी स्किनला रिपेअर करतं. ज्यामुळे त्वचा उजळते. यानं त्वचेची वय वाढण्याची प्रक्रिया स्लो होते आणि सुरकुत्या कमी होण्यासही मदत मिळते.

४) पचन तंत्र सुधारतं

हिरव्या सफरचंदामध्ये डायटरी फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचन तंत्र मजबूत राहतं. बद्धकोष्ठतेसारखी समस्या दूर होते आणि आतड्याही साफ राहतात.

५) हृदयासाठी फायदेशीर

हिरव्या सफरचंदामध्ये फ्लेवोनॉयड्स आणि पोटॅशिअम असतं, जे कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहतं. जर तुम्ही हेल्दी रहायचं असेल आणि डाएटमध्ये काही बदल करायचा असेल तर हिरवं सफरचंद बेस्ट पर्याय ठरू शकतं.
 

Web Title: Benefits of eating green apple daily you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.