Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज सकाळी उपाशीपोटी खा अर्धा चमचा तूप, पाहा काय काय मिळतात फायदे विश्वासही बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:15 IST

Eating Ghee in An Empty Stomach Benefits : तूप हे आपण खातो त्या पदार्थांची टेस्ट तर वाढवतंच, पण सोबतच या शरीराला आवश्यक ते अनेक पोषक तत्वही असतात, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. अशात उपाशी पोटी तूप खाल्ल्यानेही अनेक फायदे मिळतात,

Eating Ghee in An Empty Stomach Benefits : तूपामध्ये शरीरासाठी आवश्यक असे अनेक पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. अनेक हेल्थ एक्सपर्ट खासकरून सकाळी उपाशी पोटी तूप खाण्याचा सल्ला देतात. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी उपाशीपोटी तूप खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे सांगितले आहेत. तेच जाणून घेऊया.

उपाशी पोटी तूप खाल्ल्याने काय होतं?

वात आणि पित्त शांत होतं

डॉ. शर्मा सांगतात की, तूपाने शरीरातील वात आणि पित्त दोष शांत करण्यास मदत मिळते. वात वाढल्यामुळे त्वचा, हात-पाय दुखतात, गॅस होतो किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार असते, त्यांना यामुळे आराम मिळू शकतो. त्याचप्रमाणे, पित्त वाढल्यामुळे होणाऱ्या समस्या जसे की, शरीरात जळजळ, नीट झोप न लागणे, थकवा जाणवणे किंवा शरीराला दुर्गंध येणे या त्रासांवरही सकाळी तूप सेवन करणे उपयोगी ठरतं.

त्वचेसाठी लाभदायक

तूप त्वचेला आतून पोषण देतं. हे त्वचेत ओलावा कायम ठेवतं, चमक आणतं आणि त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतं. ज्यांना त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा असतो, त्यांच्यासाठीही सकाळी तूप घेणे फायदेशीर आहे.

शरीराला मिळते शक्ती

तूप शरीरातील शक्ती वाढवण्यास मदत करतं. मेहनत करणारे लोक, जिम करणारे किंवा वजन वाढवू इच्छिणारे यांच्यासाठी हे उत्तम नैसर्गिक सप्लिमेंट मानलं जातं.

डोळ्यांसाठी चांगलं

आयुर्वेदात तूपाला चक्षुष्य म्हणजेच डोळ्यांसाठी पोषक असं मानलं आहे. उपाशी पोटी तूप खाल्ल्यानं डोळ्यांचा थकवा कमी होतो. ज्या लोकांचं स्क्रीनवर जास्त वेळ काम चालतं, त्यांच्यासाठी तूप अतिशय फायद्याचं ठरतं.

शरीराला मिळते ऊर्जा

याशिवाय डॉ. शर्मा सांगतात की, सकाळी तूप खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते. नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर अधिक ऊर्जावान वाटते.

किती तूप खावे?

डॉक्टर सांगतात की, तूपाचे अनेक फायदे असले तरी ते जास्त प्रमाणात खाणे टाळावे. सुरुवात अर्धा चमचा तूपाने करावी. पचनशक्तीप्रमाणे हे एक ते दोन चमचे पर्यंत वाढवू शकता. जर हे रोज योग्य प्रमाणात घेतले, तर काही दिवसांतच शरीरात स्पष्ट बदल जाणवू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat Ghee on Empty Stomach: Incredible Health Benefits Revealed!

Web Summary : Eating ghee on an empty stomach offers numerous benefits, including improved digestion, skin health, energy levels, and eye health. It balances 'vata' and 'pitta' doshas, promoting overall well-being. Start with half a teaspoon daily.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स