Join us

तुपात काळी मिरी पूड टाकून खाल्ल्यानं काय होतं? फायदे इतके की रोज खाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:36 IST

Ghee And Black Pepper Benefits: अनेकांना हे माहीत नसतं की, काळी मिरी जर तुपासोबत खाल तर तुम्हाला दुप्पट फायदे मिळू शकतात. हा एक फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे.

Ghee And Black Pepper Benefits: वेगवेगळे मसाले भारतीय किचनमध्ये वापरले जातात. हे मसाले जेवणाची टेस्ट तर वाढवतातच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे देतात. असाच एक बारीकसा मसाला म्हणजे काळी मिरी. तिखट काळी मिरीमुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काळी मिरी जर तुपासोबत खाल तर तुम्हाला दुप्पट फायदे मिळू शकतात. हा एक फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे. या मिश्रणाचे तुम्हाला कोणते फायदे मिळतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काळी मिरी आणि तूपाचे फायदे

१) पचन तंत्र सुधारतं

काळ्या मिरींमध्ये पायपरिन नावाचं तत्व असतं. जे पचन एंझाइमचं उत्पादन वाढवतं. जेव्हा हे तूपासोबत खाल्लं जातं तेव्हा हे पचन आणखी चांगलं करतं. तूपामुळे पचन तंत्र सॉफ्ट होतं आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

२) अ‍ॅंटी इन्फ्लेमेटरी तत्व

काळी मिरी आणि तूप दोन्ही गोष्टींमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व भरपूर असतात. या मिश्रणाने शरीरात वेगवेगळ्या कारणांनी वाढलेली सूज कमी करण्यास मदत मिळते. 

३) इम्यून सिस्टीम मजबूत होतं

काळ्या मिरीमध्ये असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि तूपात आढळणारे व्हिटॅमिन्स व मिनरल्स मिळून शरीराची रोग प्रतिकारक क्षमताही वाढते. याने शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो,

४) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

काळ्या मिरींमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे त्वचा चमकदार करतात आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. तूप त्वचेला मॉइश्चराइज होते आणि केसांना पोषण देतं. ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

५) मानसिक आरोग्य चांगलं राहतं

तूपामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतं जे मेंदुच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. काळ्या मिऱ्यांचं नियमित सेवन केल्याने मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.

कसं खाल?

काळ्या मिरीची पूड आणि तूपाचं मिश्रण बनवण्यासाठी एक चमचा तूपात चिमुटभर काळे मिरे पावडर मिक्स करून रोज सकाळी रिकाम्या पोटी खावं. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स