Join us

रात्री झोपण्यापूर्वी प्या कोथिंबिरीचं पाणी, ४ फायदे-सकाळी उठताच जाणवेल स्वत:त बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 20:20 IST

Coriander Leaves Water: कोथिंबिरीचा वापर सगळेच करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोथिंबिरीचं पाणी आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं.

Coriander Leaves Water: कोथिंबिरीचा वापर पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी रोजच केला जातो. कोथिंबिरीशिवाय अनेक पदार्थांना चवच येत नाही. कोथिंबीरमुळे टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कोथिंबिरीला आयुर्वेदात एक शक्तीशाली औषधी मानलं जातं. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. तसेच या पानांमध्ये फायटोन्यूट्रिएंट्ससोबत डायटरी फायबर, मॅगनिज, आयर्न, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रोटीनही भरपूर असतं. तसेच यात खूप कमी प्रमाणात कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, थायमिन आणि कॅरोटीनही आढळतं.

कोथिंबिरीचा वापर सगळेच करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोथिंबिरीचं पाणी आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. जर कोथिंबीर पाण्यात भिजवून ठेवली आणि ते पाणी प्याल तर शरीराला अनेक फायदे मिळतात. एकंदर आरोग्यासाठी हे पाणी एखाद्या रामबाण उपायासारखं काम करतं. अशात कोथिंबिरीच्या पाण्याचे काय काय फायदे होतात हे जाणून घेऊया.

पचनक्रिया सुधारते

अनेकांना रात्रीच्या वेळी अपचन आणि पोट फुगण्याची समस्या होत असते. ज्यांना ही समस्या नेहमीच होते त्यांनी रात्रीच्या जेवणात कोथिंबीर आणि त्याच्या पाण्याचा समावेश करावा. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. पोटाचं आरोग्यही चांगलं लागतं.

बॉडी डिटॉक्स

कोथिंबिरी पानांमुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच किडनीचं आरोग्यही यामुळे चांगलं राहतं. इतकंच नाही तर इन्सुलिन फंक्शनमध्येही सुधारणा होते.

शुगर मॅनेज होते

डायबिटीसच्या रूग्णांसाठी कोथिंबिरीच्या पानांचं पाणी खूप फायदेशीर मानलं जातं. यानं शरीरात ब्लड शुगर लेव्हल मॅनेज करण्यास मदत मिळते. 

वजन कमी होतं

कोथिंबिरीच्या पानांच्या पाण्यात कॅलरी कमी असतात, ज्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. अशात फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते. झोपण्याआधी याचं पाणी प्यायल्यास सूज कमी करण्यास मदत मिळते आणि सोबतच वजनही कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स