Lokmat Sakhi >Food > ताकामध्ये काळं मीठ आणि ओवा घालून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच नसतील, पाहा सोपा उपाय

ताकामध्ये काळं मीठ आणि ओवा घालून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच नसतील, पाहा सोपा उपाय

Benefits Of Buttermilk With Hing Ajwain And Black Salt : ताकात सामान्यपणे हींग, ओवा आणि काळं मीठ टाकून प्यायलं जातं. पण या गोष्टी टाकून ताक प्यायल्यानं काय फायदे मिळतात हे कुणालाच माहीत नसतं. ते आज आपण जाणून घेऊ.

By अमित इंगोले | Updated: May 9, 2025 14:52 IST2025-05-09T12:37:34+5:302025-05-09T14:52:03+5:30

Benefits Of Buttermilk With Hing Ajwain And Black Salt : ताकात सामान्यपणे हींग, ओवा आणि काळं मीठ टाकून प्यायलं जातं. पण या गोष्टी टाकून ताक प्यायल्यानं काय फायदे मिळतात हे कुणालाच माहीत नसतं. ते आज आपण जाणून घेऊ.

Benefits of drinking buttermilk by adding asafoetida hing ajwain and black salt | ताकामध्ये काळं मीठ आणि ओवा घालून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच नसतील, पाहा सोपा उपाय

ताकामध्ये काळं मीठ आणि ओवा घालून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच नसतील, पाहा सोपा उपाय

Benefits Of Buttermilk With Hing Ajwain And Black Salt : उन्हाचा वाढलेला पारा आणि अशात घामाघुम झालेलं शरीर थंड करण्यासाठी या दिवसात जास्तीत जास्त लोक ताक पितात. कारण ताकानं शरीर थंड राहतं आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. ताक हे एक हेल्दी ड्रिंक्स आहे. ज्याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. यात हींग, ओवा आणि काळं मीठ टाकून प्यायलं जातं. पण या गोष्टी टाकून ताक प्यायल्यानं काय फायदे मिळतात हे कुणालाच माहीत नसतं. ते आज आपण जाणून घेऊ.

ताक, हींग, ओवा, काळं मीठ यातील पोषक तत्व

गारेगार ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. सोबतच यात अनेक व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. तेच ओव्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. सोबतच यात थायमोल नावाचं एक तत्व असतं. ज्यामुळे पचनासाठी आवश्यक एंझाइम्स शरीरात वाढतात. तर हींगामध्ये भरपूर अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे ब्लोटिंग आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत करतात. तसेच काळ्या मिठानं पचन सुधारतं. 

ताकात हींग, ओवा आणि काळं मीठ टाकून पिण्याचे फायदे

शरीर हायड्रेट राहतं

गारेगार मसाला ताकामध्ये इलेक्ट्रोलाइट्स गुण असतात. उन्हाळ्यात हे प्यायल्यानं शरीराचं वाढलेलं तापमान कमी होतं आणि शरीरात झालेली पाण्याची कमतरता दूर करतं. म्हणजे शरीर हायड्रेट ठेवतं. ताकामुळे उष्माघातापासूनही बचाव होतो.

गॅस आणि अ‍ॅसिडिटी होईल दूर

ताकामध्ये ओवा, काळं मीठ आणि हींग टाकून प्यायल्यानं गॅस-अ‍ॅसिडिटीसारख्या पचनासंबंधी समस्या दूर होतात. या गोष्टींमुळे पचनासाठी आवश्यक एंझाइम्स वाढतात. ज्यामुळे गॅस, पोट फुगणे, पोटदुखी आणि अॅसिडिटी दूर होते. काळ्या मिठामध्ये अ‍ॅंटी-अ‍ॅसिडिट गुण असतात, ज्यामुळे पोटाची जळजळ कमी होते आणि पचनासंबंधी समस्या दूर होतात.

इम्यूनिटी वाढते

ताकामध्ये प्रोबायोटिक्स गुण असतात. तर ओव्यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. अशात हे नियमितपणे प्यायल्यास शरीराची इम्यूनिटी वाढते. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होतो. हींग आणि ओव्यातील तत्वांमुळे शरीराची वेदना आणि सूज कमी करण्यास मदत मिळते.

हाडं होतात मजबूत

ताकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि इतर मिनरल्स असतात. अशात ताक नियमितपणे प्यायल्यास हाडं मजबूत होतात आणि हाडांसंबंधी समस्याही दूर होतात. 

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

ताकामधील मिनरल्स, व्हिटामिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्ससोबत इतरही अनेक गुण असतात. जे त्वचा आणि केसांना पोषण देतात. तुम्हाला जर त्वचा आणि केसांना काही समस्या असेल तर नियमितपणे मसाला ताक प्यायला हवं. 

Web Title: Benefits of drinking buttermilk by adding asafoetida hing ajwain and black salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.