Benefits of Lemon in Food: भारतात रोजच्या जेवणाच्या ताटात डाळ, भात, भाजी, चपाती या गोष्टी असतातच असतात. बऱ्याच लोकांना जेवण करताना सलाद किंवा भाज्यांवर लिंबू पिळण्याची सवय असते. लिंबू पिळल्याने भाजीला एक वेगळीच चव येते. भाजीत किंवा सलादमध्ये लिंबू पिळल्याने त्यांची चव तर वाढतेच, सोबतच यातील सिट्रीक अॅसिड आपल्या पचन तंत्राला अन्नातील पोषक तत्व अॅब्जॉर्ब करण्यासाठी तयार देखील करतं. त्याशिवाय इतरही अनेक फायदे मिळतात. ते काय हेच आज आपण पाहणार आहोत.
खासकरून शाकाहारी जेवणात असलेलं 'नॉन हीम' आयर्नला शरीर सहजपणे अॅब्जॉर्ब करू शकत नाहीत. मात्र, लिंबातील व्हिटामिन सी याला शोषूण घेण्यायोग्य बनवून अॅनीमियासारख्या आजाराचा धोका टाळतं. इतकंच नाही तर लिंबाचा रस जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यास मदत करतो. ज्यामुळे रक्तात शुगरची लेव्हल अचानक वाढत नाही. तसेच रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश केला तर आपल्या मेटाबॉलिज्मला नवी ऊर्जा मिळते आणि शरीराची इम्युनिटी सु्द्धा मजबूत होते.
आयर्नच्या अॅब्जॉर्बशनमध्ये सुधारणा
पालक आणि डाळींमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. पण शरीर ते पूर्णपणे अॅब्जॉर्ब करू शकत नाही. अशात लिंबातील एस्कॉर्बिक अॅसिड म्हणजेच व्हिटामिन सी अन्नातील आयर्नला शरीरासाठी उपयोगी बनवतं. जर आपण डाळीवर लिंबू पिळलं तर शरीरात हीमोग्लोबिनचं प्रमाण नॅचरली वाढतं. ज्यामुळे थकवा आणि कमजोरी दूर होते.
पचन तंत्र आणि एंझाइम्स सक्रिय होतात
लिंबाचा रस आपली लाळ आणि पोटातील पचनासाठी आवश्यक रसाच्या उत्पादनाला उत्तेजित करतो. सिट्रिक अॅसिड लिव्हरला पाचकरस तयार करण्यास मदत करतं, जो फॅट पचवण्यास गरजेचा असतो. जड पदार्थांवर लिंबू पिळल्यास पोट फुगणे, गॅस आणि अपचन अशा समस्या दूर होण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर लिंबाचा रस एका डिटॉक्स एजंटसारखा काम करतो. ज्याने आतडींची आतून सफाई होते.
इम्युनिटी आणि वजन कंट्रोल लिंबातील अॅंटी-ऑक्सीडेंट पेशींचा फ्री-रॅडिकल्सपासून बचाव करतात, ज्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. जेवणासोबत जर लिंबू खाल्लं तर इन्सुलिन रिस्पॉन्स चांगला राहतो, ज्यामुळे शरीरात जास्तीचं फॅट जमा होत नाही.
काय काळजी घ्यावी?
लिंबाचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे आरोग्याला मिळात. पण तरीही त्याचा वापर करताना काही काळजी घेणं गरजेचं असतं. लिंबाचा रस कधीही खूप गरम जेवणात टाकू नका. कारण व्हिटामिन सी नष्ट होतं. नेहमी लिंबू जेवण वाढून घेतल्यावर कमी गरम असलेल्या भाजीवर, डाळीवर किंवा पदार्थांवर पिळावं. एक छोटं लिंबू आपल्याला जेवणाला 'सुपरफूड' बनवू शकतं.
