कैरीचं पन्हं म्हणजे उन्हाळ्यातला गारवा.. उन्हातून घरी आल्यानंतर जेव्हा कैरीचं थंडगार पन्हं हातात आणून दिलं जातं तेव्हा उन्हाळ्यातली खरी मजा आपण अनुभवत आहोत, असं वाटून जातं. काही अपवाद सोडले तर जवळपास सगळ्यांनाच कैरीचं पन्हं खूप आवडतं. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये तर कैऱ्या उकडून त्याचा गर काढून ठेवलेला असतो. पन्हं हे आपलं पारंपरिक सरबत आहे आणि ते निश्चितच आरोग्यदायी आहे. पण ते पिताना जर आपण काही चुका केल्या तर मात्र त्याचा त्रास होऊ शकतो. तब्येत बिघडू शकते. त्यामुळेच पन्हं पिताना नेमकं काय करायला हवं आणि काय टाळायला हवं ते पाहूया...(avoid 3 things while having aam panha)
उन्हाळ्यात पन्हं पिताना कोणती काळजी घ्यावी?
१. आपल्याला हे माहितीच आहे की बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड ज्यूसमध्ये खूप जास्त प्रमाणात साखर आणि प्रिझर्व्हेटीव्ह असतात. त्यामुळे त्यांच्यापेक्षा आपल्याकडची पारंपरिक सरबतं पिणं कधीही चांगलं.
घोसाळ्याचा ठेचा- एकदा खाऊन पाहा, वारंवार आवडीने खाल, घ्या जेवणाला रंगत आणणारी सोपी रेसिपी
पण तरीही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी पन्हं पिताना आपल्या तब्येतीकडेही लक्ष ठेेवावं. कारण कैरीचा आंबटपणा कमी करण्यासाठी पन्ह्यामध्ये भरपूर साखर किंवा गूळ घातलेला असतो. त्यामुळे पन्हं पिण्याचं प्रमाण मर्यादित असावं. कारण त्याचा अतिरेक झाल्यास शुगर आणि वजन दोन्हीही वाढू शकतं.
२. कैरीचं पन्हं पिताना त्यात भरपूर बर्फ घालणं टाळावं. कारण बर्फ घालून गारेगार केलेलं पन्हं आरोग्यासाठी चांगलं नाही. भर उन्हातून घरी आल्यानंतर असं बर्फ घातलेलं पन्हं घेणं तर टाळायलाच हवं. त्यापेक्षा माठातलं गार पाणी घेऊन त्याचं पन्हं केलं तर ते अधिक आरोग्यदायी असतं. बर्फ घालून केलेलं पन्हं प्यायल्यास पचनक्रियाही बिघडू शकते.
उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शनच सोडा- 'हा' घरगुती लेप लावून चेहरा धुवा, त्वचा काळवंडणारच नाही
३. आपल्याला माहितीच आहे की आंबट कैरी वापरून पन्हं केलं जातं. त्यामुळे असं आंबट पन्हं सकाळी नाश्त्याच्या आधी किंवा उपाशीपोटी पिणं चांगलं नाही. त्यामुळे ॲसिडीटी, पित्त वाढणे, उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास होऊ शकतो. अशी माहिती डॉ. मोहम्मद इक्बाल यांनी न्यूज १८ ला दिली आहे.
