Lokmat Sakhi >Food > कचरा समजून लिंबाची साल फेकाल तर होईल पश्चाताप, असा वापर केला तर मिळतील अनेक फायदे!

कचरा समजून लिंबाची साल फेकाल तर होईल पश्चाताप, असा वापर केला तर मिळतील अनेक फायदे!

Lemon Peel Benefits : लिंबाच्या सालीचे काय फायदे होतात आणि याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:28 IST2025-02-12T11:21:18+5:302025-02-12T11:28:53+5:30

Lemon Peel Benefits : लिंबाच्या सालीचे काय फायदे होतात आणि याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता हे जाणून घेऊ.

Benefits and Uses of Lemon Peel | कचरा समजून लिंबाची साल फेकाल तर होईल पश्चाताप, असा वापर केला तर मिळतील अनेक फायदे!

कचरा समजून लिंबाची साल फेकाल तर होईल पश्चाताप, असा वापर केला तर मिळतील अनेक फायदे!

Lemon Peel Benefits : लिंबाचा रोज वेगवेगळ्या कामांसाठी वापर केला जातो. लिंबू हे एक असं फळ आहे ज्यात अनेक औषधी गुण आहेत. ज्यामुळे अनेक उपचारांमध्येही त्याचा वापर केला जातो. सामान्यपणे लिंबाच्या रसाचा वापर करून त्याची साल कचरा समजून फेकली जाते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लिंबाची सालही अनेक कामात महत्वाची ठरते. लिंबाची ताजी साल किंवा वाळवलेल्या सालीचाही तुम्ही अनेक दृष्टीने वापर करू शकता. लिंबाच्या सालीचे काय फायदे होतात आणि याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता हे जाणून घेऊ.

लिंबाच्या सालीचे फायदे

लिंबाच्या सालीचा चहा

लिंबाच्या सालीचा चहा बनवून पिऊ शकता. लिंबाची साल पाण्यात उकडून त्यात टेस्टनुसार मध टाकून पिऊ शकता. या चहानं पचनक्रिया चांगली होते, इन्फ्लेमेशन कमी होतं आणि इम्यूनिटीही बूस्ट होते. तसेच घशात वेदना, खोकला, सर्दी अशा समस्याही या चहाने दूर होतात.

नॅचरल क्लेंजर

लिंबाच्या सालीमध्ये असलेल्या हाय सिट्रिक तत्व, अॅंटी-बॅक्टेरिअल गुण आणि अॅंटी-सेप्टिक तत्व यांपासून तुम्ही एक चांगलं क्लीनिंग एजेंट बनवू शकता. या नॅचरल क्लेंजरचा वापर तुम्ही सिंक, भांडी आणि प्लास्टिकच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी करू शकता. क्लेंजर तयार करण्यासाठी व्हाईट व्हिनेगरमध्ये लिंबाची साल टाकून काही वेळ ठेवा. या मिश्रणाचा वापर नॅचरल क्लेंजर म्हणून करू शकता.

फेसपॅक

लिंबाची साल वाळवून नंतर त्याचं पावडर तयार करा. या पावडरचा वापर फेस पॅक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये मध, गुलाबजल किंवा दूध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा नंतर चेहरा धुवून घ्या. या फेस पॅकने चेहरा फ्रेश दिसतो. तसेच चेहऱ्यावरील डागही दूर होण्यास मदत मिळते.

रूम फ्रेशनर

लिंबाच्या सालीचा सुगंध आणि अरोमा यामुळे लिंबाच्या सालीचा वापर रूम फ्रेशनर म्हणूनही करू शकता. अशात तुम्ही लिंबाची साल घरात छोट्या भांड्यामध्ये किंवा पॉटमध्ये टाकून ठेवू शकता. याने घरात सुगंध पसरेल.

Web Title: Benefits and Uses of Lemon Peel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.