हिवाळा सुरु झाला की आपण आहारात बाजरीचा समावेश करतो. बाजरी ही आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. बाजरी उष्ण प्रकृतीची असल्यामुळे शरीराला उब देण्याचे काम करते.(bajra dosa recipe) पण रोज रोज बाजरीची भाकरी खाऊन अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी आपल्याला काहीतरी नवीन आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते. डोसा बनवायचं म्हटलं तर खूप वेळखाऊ आणि किचकट काम.(healthy breakfast recipe) अनेकदा तर डोसा तव्याला चिकटतो, पीठ व्यवस्थित आंबूसले नसेल तर डोसा परफेक्ट तयार होत नाही. (morning breakfast idea)
पण आज आम्ही अशी रेसिपी सांगणार आहोत जी भरपूर पौष्टिक आहे. हाय बीपी आणि डायबिटीस असणारे लोक आनंदाने हा डोसा खाऊ शकतात. याची चव इतकी छान लागते की मुले देखील आवडीने हा पदार्थ खातील. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
बाजरी - अर्धा कप
मूगडाळ - अर्धा कप
उडीद डाळ - १/४ कप
मेथी दाणे - १ चमचा
पोहे - १/४ कप
मीठ - चवीनुसार
तूप
लाल मिरची पावडर - १ चमचा
कोथिंबीर - चवीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला डाळ आणि बाजरी एकत्र करुन स्वच्छ धुवून घ्यावे लागतील. त्यानंतर त्यात मेथी दाणे आणि पाणी घालून ७ ते ८ तास भिजत घाला.
2. यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली बाजरी, पोहे आणि पानी घालून बॅटर तयार करा. पुन्हा ७ ते ८ तास झाकून ठेवा.
3. बॅटर व्यवस्थित आंबल्यानंतर त्यात मीठ घालून फेटून घ्या. आता पॅनला ग्रीस करुन घ्या. त्यावर तयार बॅटर पसरवून घ्या. वरुन तूप, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर घालून डोसा दोन्ही भाजून कुरकुरीत भाजा. तयार होईल बाजरीचा पौष्टिक डोसा.
