Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजरीच्या खारोड्यांची अस्सल मराठवाडी रेसिपी, तळून खा किंवा कच्च्या खा, चवीला एकदम मस्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2026 17:27 IST

Bajarichya Kharodya Recipe: उन्हाळ्यात बाजरीच्या खारोड्या किंवा सांडगे करायचे असतील तर ही रेसिपी एकदा बघाच..(how to make bajarichya kharodya?)

ठळक मुद्देसुरुवातीला अगदी अर्धा किलो बाजरी घेऊन तेवढ्याच खारोड्या करून पाहा. त्या व्यवस्थित जमल्या की मग प्रमाण वाढवायला हरकत नाही.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की घरोघरी वाळवणाची लगबग दिसायला लागते. कुरडया, पापड्या, वडे, उपवासाचे वेगवेगळे पदार्थ अशी सगळीच चंगळ असते. या पदार्थांमधलं एक मुख्य आकर्षण म्हणजे बाजरीच्या खारोड्या. काही ठिकाणी त्याला सांडगे देखील म्हणतात. काही ठिकाणी बाजरीच्या खारोड्या थापून पापडीसारख्या केल्या जातात तर काही ठिकाणी नुसते वडे तोडले जातात. आता आपण मराठवाडी पद्धतीने केलेल्या बाजरीच्या खारोड्यांची रेसिपी पाहणार आहोत (how to make bajarichya kharodya?). सुरुवातीला अगदी अर्धा किलो बाजरी घेऊन तेवढ्याच खारोड्या करून पाहा. त्या व्यवस्थित जमल्या की मग प्रमाण वाढवायला हरकत नाही.(how to make bajariche sandage?)

बाजरीच्या खारोड्यांची रेसिपी

 

पारंपरिक पद्धतीने चवदार अशा बाजरीच्या खारोड्या कशा करायच्या याची रेसिपी MadhuraPalve's Kitchen या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

अर्धा किलो बाजरी

तुम्ही पपई खा आणि सालं रोपांना द्या! कुंडीतल्या रोपांना हे खत देते ताकद, येतात भरपूर फुलं

१ किलो तीळ

चवीनुसार मीठ आणि लाल तिखट

कृती

बाजरीच्या खारोड्या करण्यासाठी सगळ्यात आधी बाजरी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तिच्यामधलं पाणी पुर्णपणे निथळून घ्या. 

 

घरातच एक कॉटनचा कपडा पसरवून घ्या आणि त्यावर बाजरी पंख्याखाली वाळत घाला. साधारण पाऊण तासात बाजरी थोडी सुकली की ती मिक्सरमधून जाडसर भरडून घ्या.

यानंतर तिच्यामध्ये पाणी घाला. ती हातानेच थोडी चोळून घ्या. पाण्याच्या वर जो कोंडा येईल तो गाळून काढून टाका. एक दोन वेळा हीच क्रिया करून बाजरीतला कोंडा पुर्णपणे काढून घ्या.

१५ मिनिटांत सोला किलोभर लसूण, बघा झटपट लसूण सोलण्याच्या भन्नाट ट्रिक

यानंतर साधारण २ लीटर पाणी घालून भरडलेली बाजरी २ दिवस भिजू द्या. बाजरी भिजून त्यातून आंबूस वास यायला लागला की मग गॅसवर एक मोठं पातेलं किंवा कढई ठेवा. अर्धा किलो बाजरीसाठी साधारण १ लीटर पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात बाजरीचा भिजलेला भरडा घालून तो शिजवून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट आणि तीळ घाला. शिजवताना पाणी कमी पडत आहे असं वाटल्यास त्यात थोडं गरम पाणी घाला. पीठ दाटून थोडं घट्ट झालं की गॅस बंद करा. आता या पिठाच्या तुम्ही खारोड्या करू शकता.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwadi Bajra Kharodi Recipe: A Delicious Summer Snack

Web Summary : Make traditional Marathwadi-style Bajra Kharodi at home! Bajra is soaked, ground, and cooked with sesame seeds, chili powder, and salt. Enjoy these crispy snacks fried or raw.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल