राखीपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातात. बहिणीही मोठ्या हौशीने भावासाठी सुग्रास जेवणाचा बेत आखतात. आता बऱ्याचदा प्रश्न पडतोच की भावासाठी कोणता खास पदार्थ करावा.. तुम्हीही याच पेचात असाल तर वांग्याच्या झणझणीत भाजीचा बेत करा (how to make baingan masala). त्यासाठी पुढे सांगितलेली रेसिपी पाहा (baingan masala recipe). या रेसिपीनुसार केलेली भाजी एवढी चवदार होईल की यानंतर तुमचा भाऊ आणि घरातले सगळेच अशाच चवीची वांग्याची भाजी कर म्हणून हट्ट करतील.(vangyachya bhajichi recipe in Marathi)
हिरव्या, काळ्या वाटणातील वांग्याच्या भाजीची रेसिपी
साहित्य
२ ते ३ मध्यम आकाराचे कांदे
२ ते ३ टेबलस्पून खोबऱ्याचे काप
अर्धा टेबलस्पून बडिशेप
अर्धा टेबलस्पून धणे आणि जिरे
रोज सकाळी प्या ‘हे’ पाणी, दिवसभर थकवा येणार नाही-तब्येतीच्या तक्रारी छळणार नाहीत
१ इंच दालचिनीचा तुकडा
१ इंच आल्याचा तुकडा
लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या
६ ते ७ मध्यम आकाराचे वांगे
एक वाटी कोथिंबीर
४ ते ५ हिरव्या मिरच्या
कृती
कांद्याचे पुढचे आणि मागचे देठ काढून घ्या. त्याची टरफलं काढून टाका आणि तसेच अख्खे कांदे पापड भाजण्याच्या जाळीवर ठेवून गॅसवर भाजून घ्या.
तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घालून खोबरे, लसूण, मिरची, आले, कोथिंबीर, दालचिनी, बडिशेप, जिरे, धणे असं सगळं एकेक करून तळून घ्या.
यानंतर भाजून झालेले कांदेही हाताने हलकेच मॅश करा आणि ते ही तळून घ्या. कांदे आणि तळून घेतलेले इतर पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
वांगे पुर्णपणे न कापता त्याला मधोमध एक छेद द्या. त्यामध्ये वरीलपद्धतीने तयार केलेले वाटण थोडे थोडे भरा. कढईमध्ये फोडणी करून घ्या आणि वाटण भरलेले वांगे दिड ते दोन मिनिटे वाफवून घ्या.
सतत चिडचिड-छातीत धडधड-सतत वाटतं उदास? रामदेव बाबा सांगतात ३ उपाय- मन शांत होईल
यानंतर त्यामध्ये बाकीचे राहिलेले वाटण, गरम मसाला, कोमट पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून भाजी मंद आचेवर शिजू द्या. सगळ्या शेवटी गॅस बंद करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झणझणीत वांग्याची भाजी तयार.