उद्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यात बैलपोळा (Bail Pola 2025) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. बळीराजाचा खरा सोबती म्हणून बैलांचा सन्मान केला जातो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या या मुक्या प्राण्याला अंघोळ घालून, शिंगाना रंगवून, नवी वेसण, गोंडा घालून सजवतात. त्यानंतर त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. (Puranpoli Making Tips)
या सणाचा खास पदार्थ म्हणजे पुरणपोळी. प्रत्येक घरी पुरणपोळी बनवण्याची लगबग सुरू असते, पण अनेकदा पुरणपोळी करताना ती लाटताना फाटते किंवा नीट होत नाही. यासाठीच आज आपण पाहणार आहोत की, पारंपरिक चवीची पुरणपोळी न लाटता कशी बनवता येते. (No-Roll Puran Poli For Bail Pola)
1) पुरण तयार करणे
चणाडाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये थोडं पाणी घालून मऊ शिजवून घ्या. शिजवताना पाणी जास्त घालू नका.शिजवलेली डाळ चाळणीत काढून घ्या, जेणेकरून जास्तीचं पाणी निघून जाईल. हे पाणी तुम्ही कटाची आमटी बनवण्यासाठी वापरू शकता. आता एका जाड कढईत शिजलेली डाळ आणि गूळ एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत राहा, जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही आणि मिश्रण घट्ट होत नाही. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. त्यात वेलची पूड, जायफळ पूड आणि साजूक तूप घालून व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर पुरण यंत्रातून (mixer) फिरवून घ्या.
२) कणिक मळणे
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, मीठ आणि तेल एकत्र करा. थोडे-थोडे पाणी घालून कणिक मळून घ्या. कणिक खूप घट्ट किंवा खूप सैल नसावी. ती मऊ आणि लवचिक असावी. कणकेला १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
न लाटता पुरणपोळी कशी करावी?
१) एक सपाट प्लास्टिकचा कागद घ्या आणि त्याला थोडं तेल लावा. यामुळे कणिक चिकटणार नाही. मग कणकेचा एक छोटा गोळा घ्या, तो तळहातावर चपटा करा आणि त्यात पुरणाचा गोळा भरा.
टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा
२) कणकेच्या गोळ्याचे तोंड नीट बंद करून पुरण आतमध्ये बंद करा. आता हा पुरण भरलेला गोळा प्लास्टिकच्या कागदावर ठेवा.
३) बोटांनी हळूहळू आणि हलक्या हाताने पोळीला दाबून पसरवा पोळी पातळ होईपर्यंत पसरवत राहा. तुम्ही ही पोळी प्लास्टिकच्या पिशवीला दोन्ही बाजूंच्या मध्ये दाबूनही बनवू शकता.
प्रेशर कुकरमध्ये फक्त ५ मिनिटांत करा रवाळ तूप; दोन शिट्ट्या करताच कढवलेलं तूप तयार!
४) तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यावर थोडं तूप घाला. तयार झालेली पुरणपोळी प्लास्टिकवरून अलगद उचला आणि तव्यावर टाका. पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.