Join us  

हिवाळ्यात खायलाच हवा बदामाचा शिरा, दुखणी जातील पळून- तब्येत होईल ठणठणीत, बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 9:11 AM

Badam Halwa Recipe: बदामाचा शिरा हा पदार्थ खासकरून फक्त हिवाळ्यात खातात. त्यामुळे आता थंडीचे काहीच दिवस बाकी  असल्याने ही रेसिपी चटकन करून पाहा.... (badamacha sheera recipe in marathi)

ठळक मुद्देबदाम उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीर उबदार ठेवायला मदत होतेतूप आणि बदाम यामुळे हाडांचे दुखणे कमी होते, त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास फायदा होतो.

रव्याचा शिरा आपण नेहमीच खातो. पण हिवाळ्यात विशेषकरून बदामाचा शिरा खाल्ला जातो. आपल्या घरातल्या आई- आजी अशा वयस्कर महिला हिवाळ्यात बदामाचा शिरा खाण्याचा उल्लेख अनेकदा करत असतील आणि अनेकींनी तुम्हाला तो करून खाऊही घातला असेल. हिवाळ्यात सकाळी लवकर बदामाचा शिरा (Badam Halwa recipe) खावा असं म्हणतात. त्यामुळे तो चांगला पचतो. बदाम उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीर उबदार ठेवायला त्याची मदत होते (badamacha sheera recipe in marathi). शिवाय तूप आणि बदाम यामुळे हाडांचे दुखणे कमी होते, त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास फायदा होतो. शिवाय तूप, बदाम या उष्ण पदार्थांमुळे हिवाळ्यात सर्दीचा त्रास होत नाही, असंही म्हणतात. त्यामुळेच हा बहुगुणी बदामाचा शिरा एकदा करून बघाच...(how to make badam halwa?)

बदामाचा शिरा करण्याची रेसिपी

 

साहित्य

एक वाटी बदाम

पाऊण वाटी तूप 

प्रजासत्ताक दिन: ३ रंग वापरून केलेल्या ९ 'तिरंगा रेसिपी', बघा तुम्हाला कोणता पदार्थ आवडला

पाऊण वाटी साखर 

दिड वाटी दूध

कृती

सगळ्यात आधी बदाम रात्री पाण्यात भिजत घाला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची टरफलं काढून टाका आणि ते मिक्सरमधून फिरवून त्याची जाडीभरडी पेस्ट करून घ्या. 

 

कढई गॅसवर तापायला ठेवा आणि त्यात तूप टाका.

तूप तापलं की त्यात मिक्सरमधून फिरवलेली बदामाची पेस्ट टाका आणि मंद आचेवर व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्या.

थंडीच्या दिवसांत प्या बदामाचं गरमागरम दूध, बघा ही कुणाल कपूर स्पेशल रेसिपी, मुलांनाही आवडेल

यानंतर त्यात दूध टाका. मध्यम आचेवर हे मिश्रण उकळू द्या. अधून मधून हलवत राहा.

सगळं दूध आटून आलं की मग त्यात साखर टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण आळून येईपर्यंत शिरा शिजू द्या.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती