Join us

शिल्लक राहिलेली चपाती पुन्हा गरम करून खावी की नाही? पाहा असं केल्यास काय होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:41 IST

Can we reheat roti: असं करणं योग्य असतं का? चपाती पुन्हा गरम करावी का? हेच आपण आज एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत.

Can we reheat roti: चपाती हा भारतीय जेवणातील सगळ्यात महत्वाचा भाग असते. जास्तीत जास्त लोक दिवसातून तीन वेळा चपाती आणि भाजी खातात. अनेकदा घरात चपात्या जास्तीच्या बनवल्या जातात. ज्यानंतर पुन्हा गरम करून खाल्ल्या जातात. पण असं करणं योग्य असतं का? चपाती पुन्हा गरम करावी का? हेच आपण आज एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत.

चपाती पुन्हा गरम करून खाणं किती बरोबर?

फेमस आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्या सांगतात की, आयुर्वेदानुसार, ही सवय तब्येतीसाठी चांगली नाही. जेव्हा पुन्हा गरम केली जाते, तेव्हा ती अधिक कडक आणि कोरडी होते. यामुळे आपल्या पचनावर प्रभाव पडू शकतो. तसेच गॅस आणि ब्लोटिंगची म्हणजेच पोट फुगण्यासारखी समस्याही होऊ शकते.

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, ताजं पाणी चपातीला मुलायम बनवतं आणि पोषणही देतं. पण चपाती पुन्हा पुन्हा गरम केली तर चपाती कडक होते आणि पोषणही कमी होतं. त्यामुळे चपाती पुन्हा पुन्हा गरम करू नये.

सोबतच श्वेता शाह यांनी सांगितलं की, कोणते पदार्थ पुन्हा गरम करणं टाळलं पाहिजेत. ते पाहुयात.

भात

श्वेता शाह यांच्यानुसार, भात पुन्हा गरम केल्यावर त्यात लपून बसलेले बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. खासकरून तेव्हा जेव्हा भात जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा गरम केला जातो. जर हा भात खाल्ला तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.

पालक पनीर

न्यूट्रिशनिस्टनुसार, पालक पनीरला पुन्हा गरम केल्यानं यातील पोषक तत्व नष्ट होऊ शकतात आणि यातील काही तत्व हे टॉक्सिनचं रूप घेऊ शकतात. 

चहा

चहा गरम केल्यावर त्याची टेस्ट तर बिघडतेच, सोबतच त्यातील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स नष्ट होतात. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस, जळजळ अशा समस्या होण्याचा धोका असतो.

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, आयुर्वेदानुसार ताजं जेवण शरीराला पोषण देतं पचन चांगलं राहतं आणि आजारांपासून बचाव करतं. त्यामुळे नेहमीच प्रयत्न केला पाहिजे की, रोज ताजं जेवण केलं पाहिजे. रोज वेळेवर जेवण केलं पाहिजे. तसेच ही काळजी घ्यावी की, जेवण फ्रिजमध्ये ठेवल्यावर जास्त वेळ गरम करू नये. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य