Best and worst times to have Tea : भारतात चहा पिणाऱ्यांची काही कमी नाही. जास्तीत जास्त लोक सकाळी झोपेतून उठल्यावर गरमा गरम दुधाचा एक कप चहा पिणं पसंत करतात. कॉफी आणि हर्बल टी पिणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढत असली तरी दुधाच्या चहासमोर हे काहीच नाही. काही लोक तर दिवसभरातून 5 पेक्षा जास्त कप चहा पितात. आता तर पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाच्या सरी गरमागरम चहा आणि भजी खाण्याचा आनंद तर भरपूर लोक घेतात.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलं की, भारतात तब्बल 64 टक्के लोक रोज चहा पितात आणि त्यातील 30 टक्के लोक सायंकाळी चहा पितात. डॉक्टर लिहितात की, चहा पिणं ठीक आहे. पण चहा पिण्याची वेळही महत्वाची आहे. कोणत्याही वेळी चहा पिणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात चहा पिण्याची योग्य वेळ आणि चुकीची वेळ कोणती हे जाणून घेऊ.
चहा पिण्याची चुकीची वेळ आणि पद्धत
- डॉक्टर लिहितात की, उपाशीपोटी कधीही चहा पिऊ नये. असं केल्यानं शरीरात चिंता वाढवणारे कार्टिसोल हार्मोन रिलीज होतात. शरीरात सूज वाढण्याची धोका वढतो. तसेच पुढे जाऊन अल्सर होण्याची शक्यताही असते.
- रात्री झोपण्याच्या काहीवेळ आधी चहा पिणं टाळलं पाहिजे. यानं तुमची झोप खराब होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला वात, चिंता अशा समस्या होऊ शकतात.
- जर तुम्हाला अॅसिडिटी असेल तर तुम्ही चहा पिऊ नये. चहा नॅचरली आम्लीय असतो आणि यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
- जेवण करण्याआधी आणि जेवण केल्यावर लगेच चहा पिऊ नये. यानं अन्नातील पोषक तत्वांचं अवशोषण कमी होतं.
- आयर्न सप्लीमेंटसोबत कधीही चहा पिऊ नये. चहामधील टॅनिन आयर्नच्या अवशोषणात अडथळा निर्माण करतात. हे टॅनिन आयर्नमध्ये मिक्स होतात, ज्यामुळे शरीराला याला अवशोषित करणं अवघड होतं.
चहा पिण्याची योग्य वेळ
डॉक्टर सांगतात की, चहा सकाळी झोपेतून उठल्यावर साधारण 2 तासानंतर प्यावा. तोही काहीतरी खाल्ल्यावर, पाणी प्यायल्यावर किंवा नाश्ता केल्यावर.